आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गंगापूर:-गंगापुरात पोलिसांची धडक कारवाई ,44 गाईंची केली कत्तलखान्यातून सुटका.

पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक

गंगापुरात पोलिसांची धडक कारवाई ,44 गाईंची केली कत्तलखान्यातून सुटका.

गंगापूर पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलखान्यावर जम्बो कारवाई करत तब्बल 44 गोवंशाची सुटका केली आहे तरी या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार पोलीस निरीक्षक सत्यजित आहेत वाले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गंगापूर शहरातील पुरेशी मोहल्ला या शहरातील मध्यवर्ती ठिकाणांमध्ये असलेल्या परिसरात राहतात व अवैध कत्तलखाना सुरू आहे ज्यामध्ये गोवंश जातीची जनावरे ही सदरील व्यक्तीने शेतात लपवून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती, या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक ताईतवाले यांच्या पथकाने वेशांतर करत कुरेशी मोहल्ला परिसरात छापा टाकला असता सलीम इस्माईल कुरेशी व जुबेर आयुब कुरेशी यासोबतच कलीम कुरेशी यांच्या घराच्या परिसरात सापळा लावला तेथे पोलिसांना संशयित हालचाली दिसून आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने घराच्या वाड्यात प्रवेश केला. यावेळी घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मोकळ्या वाड्यात गोवंशाची कत्तल झाल्याचे तसेच काही गोष्ट ठेवल्याचे दिसून आले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पंचनामा करत कत्तलेकरिता आणलेली 14 जिवंत गोवंश जातीची जनावरे व एक मयत गोवंश जातीची जनावरे जप्त केले आहे यासोबतच सलीम इस्माईल कुरेशी व जुबेर आयुग कुरेशी या दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे, तर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य जाणून घेत सखोल चौकशी करत, आसिफ युसुफ कुरेशी बब्बू अहमद बागेत मुनाफ कुरेशी अफसर कुरेशी यांच्या गंगापूर परिसरातील शेतामध्ये छापे मारून कत्तलेकरिता आणलेल्या गोव्याच्या मुक्तता केली. या सर्व कारवाई मध्ये पोलिसांनी 44 जातीची जनावरे गोवंश कत्तलकरिता वापरण्यात येणारे साहित्य ज्यामध्ये सत्तूर,चाकू, कोयता लाकडी ठोकळा तसेच शंभर किलो क्षमतेचा वजन काटा यासोबतच गोवत जनावरांच्या कत्तल नंतर उरणारी चरबी यापासून बनवलेला डालडा असे एकूण आठ लाख 88 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले पोलीस उपनिरीक्षक दीपक आवटे,शकील शेख, प्रमोद काळे, पोलीस हवालदार शेळके, शिपाई नवले,खाडे, सिंगल, सोनकांबळे, वडमारे, कांबळे, राठोड, गुसिंगे, देवकते, पाटील, धारकर यांच्या पथकाने केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button