आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छ.संभाजीनगर:-बाप्पाला निरोप देण्यासाठी आज 15 मिरवणुका; 12 विसर्जन विहिरी, 4 कृत्रिम तलाव, 47 मूर्ती संकलन केंद्रे सज्ज, 4,500 पोलिस तैनात.

पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक:-7397937231

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक

बाप्पाला निरोप देण्यासाठी आज 15 मिरवणुका; 12 विसर्जन विहिरी, 4 कृत्रिम तलाव, 47 मूर्ती संकलन केंद्रे सज्ज, 4,500 पोलिस तैनात.

गेल्या १० दिवसांपासून चैतन्याचा स्रोत बनलेल्या गणपती बाप्पाला आज अनंंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी जुन्या शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक संस्थान गणपती ते जिल्हा परिषद मैदान या मार्गावरून निघणार असल्याने हा मार्ग सकाळी ७ वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मिरवणूक मार्गासह संपूर्ण शहरात तब्बल ४,५०० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून महापालिकेच्या वतीने १२ विसर्जन विहिरींसह ४ कृत्रिम तलाव व ४७ मूर्ती संकलन केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत.

शहरात सुमारे १२ ते १५ मोठ्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत, छावणी आणि दौलताबाद हद्दीतील मिरवणुका उद्या (२९ सप्टेंबर) निघतील. मुख्य मिरवणुकीशिवाय सिडको-हडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी, नवीन शहर, वाळूज, हर्सूल, सातारा, छावणी, जिन्सी येथूनही मिरवणुका निघणार आहेत. यंदा प्रथमच पाच अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांनी गस्त केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार मिरवणुकीत डीजेच्या आवाजाची पातळी मोजण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे. रात्री १२ वाजेपर्यंत वाद्यांना परवानगी असली तरी मिरवणुकीतील डीजेच्या आवाजाची पातळी मोजली जाणार आहे. तसेच मशिदींजवळ विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. मनपाच्या अग्निशमन दलाने ८ ठिकाणी नियंत्रण कक्ष उभे केले आहेत.

विसर्जनाचे नियोजन
१२ : विहिरींमध्ये होणार विसर्जन
०४ : कृत्रिम तलाव – हर्सूल, गारखेडा, ज्योतीनगर आणि देवळाईमध्ये कृत्रिम तलाव सज्ज
४७ : मूर्ती संकलन केंद्रे व पथके
०३ : राखीव पथके
०५ : आपत्कालीन पथके

पर्यायी मार्ग

-रोशन गेटकडून शहागंजकडे जाण्यासाठी चेलीपुरा चौक, सिटी चौकच्या मागील रोडने वाहतूक चालू राहील.
-मिलकॉर्नर ते औरंगपुरा मार्गावर वाहने अंजली टॉकीजजवळून उजवीकडे नागेश्वरवाडी डॉ. खनाळे हॉस्पिटल, निराला बाजार, समर्थनगरकडे, तर अंजली टॉकीजपासून डावीकडे खडकेश्वर, महापालिकेकडे जातील.

इंदूरहून गुलाल, फुलंब्रीहून झेंडू, तर जालन्याहून आले गुलाब

विसर्जन मिरवणुकीसाठी बाजारात छत्तीसगडमधील रायपूर, मध्य प्रदेशातील प्रीतमपूर, इंदूर येथून गुलालाची आवक झाली. शहरातील तीन होलसेल व्यापाऱ्यांकडून यंदा ४० टन गुलालाची विक्री झाल्याची माहिती होलसेल व्यापारी सुजितकुमार सावजी यांनी दिली. तर, १०० क्विंटलहून अधिक फुलांची विक्री झाल्याचे फुलांचे होलसेल व्यापारी कृष्णा बनकर म्हणाले. फुलंब्री, कन्नड येथून ३० ते ५० रुपये किलो दराने झेंडू, जालना, परतूर येथून २५० ते ३०० रुपये दराने गुलाब तर ५० ते ६० रुपये किलो दराने शेवंतीच्या फुलांची आवक झाली.

या ठिकाणी आहेत मूर्ती संकलन केंद्रे.

खडकेश्वर महादेव मंदिर, बेगमपुरा, पांडे निवास, नंदनवन कॉलनी विश्रामबाबा शाळा, पडेगाव वाणी कॉम्प्लेक्स, सराफा येथील गांधी पुतळा, शहागंज चमन, गुलमंडी पार्किंग, समर्थनगर सावरकर चौक, साखरे मंगल कार्यालयासमोर, पोलिस कॉलनी सभागृह, टीव्ही सेंटर शॉपिंग कॉम्प्लेक्स, जटवाडा रोड, हर्सूल तलाव स्मृतिवन गार्डन, मयूर पार्क एसबीओए शाळा, रामलीला मैदान एन-७, राजीव गांधी स्टेडियम, चिकलठाणा न्यू हायस्कूल, गरवारे स्टेडियम, मुकुंदवाडी बसस्टॉप, सिडको एन-२ कामगार चौक, चिकलठाणा डाॅ. आंबेडकर चौक.

पोलिसांची विशेष पथके तैनात.

गणेश विसर्जनादरम्यान गुन्हे शाखा, दारूबंदी, साध्या वेशातील विशेष शाखा, वाहतूक शाखा, ध्वनिप्रदूषण, घातपातविरोधी तपासणी, छेडछाडविरोधी, दहशतवादविरोधी आदी पथके कार्यरत असणार आहेत. याशिवाय हरवलेल्या, सापडलेल्या मुला-मुलींसाठी माहिती केंद्रे तैनात करण्यात आली आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button