श्रीरामपूर:-वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मुलाखतीला इच्छुकांचा उदंड प्रतिसाद, चरणदादा त्रिभुवन.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मुलाखतीला इच्छुकांचा उदंड प्रतिसाद, चरणदादा त्रिभुवन.
श्रीरामपूर (RPS स्टार न्यूज श्रीरामपूर )तालुक्यातील 17 ग्रामपंचायत च्या निवडणुकी संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीरामपूर येथील व्हीआय पी गेस्ट हाऊस श्रीरामपूर या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यावेळेस मुलाखत घेण्यासाठी निरीक्षक म्हणून जिल्हाध्यक्ष विशाल भैया कोळगे महासचिव अनिलभाऊ जाधव डॉ साळवे सर नागेशअण्णा क्षीरसागर पास्टर रावसाहेब त्रिभुवन मधुकरराव साळवे सुनीलजी ब्राह्मणे ऍड मोहन शोभाताई नवले पाटील आदींनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, प्रत्येक एका एका उमेदवाराला बोलावून तुम्ही सरपंच किंवा सदस्य म्हणून निवडून आला तर गावासाठी काय कराल गावाचा कसा विकास कराल व निवडणूक आयोगाला जे जे कागदपत्र लागतात ते तुमच्याकडे आहे का असे प्रश्न विचारून उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या, मुलाखत देणाऱ्या इच्छुक उमेदवार मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन म्हणाले की आज 17 गावातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी व तसेच इतर पक्षातील देखील इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या, आजच्या मुलाखतीवरून 6 तारखेला म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी आमचे किती उमेदवार निवडून येतील हे आम्ही आज सांगत नाही परंतु निकालाच्या दिवशीआमच्या अंगावरती गुलाल दिसेल असा विश्वास चरणदादा त्रिभुवन यांनी व्यक्त केला, मुलाखतीला उपस्थित म्हणून दर्शनाताई काळे अशोकराव लोंढे पोस्टर सचिन चक्रनारायण अंबादास शेळके राहुल खंदारे सर अशोकराव शिंदे सुमेधभैय्या पडवळ किशोरभाऊ ठोकळ संतोष त्रिभुवन अवी वाहुळ सार्थक नवले सनी त्रिभुवन अरुण बागुल संघराज त्रिभुवन सुनील कोळगे बाबा पगारे अरुण खरात भास्कर माघाडे शंकर भाऊ शेळके किरण रणनावरे छाया ताई निकम पुनम त्रिभुवन आधी उपस्थित होते,