सातारा:-गोवे श्री कोटेश्वर विद्यालयाला नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांची अटल लॅबला भेट.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
श्री कोटेश्वर विद्यालयाला नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांची अटल लॅबला भेट.
गोवे दि:
श्री कोटेश्वर विद्यालय गोवे येथील अटल रोबोटिक्स लॅबला केंद्र सरकारच्या खावली येथील नवोदय विद्यालय, सातारा येथील विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक श्री रोहित सिंह आलुवालिया व सौ महामुनी मॅडम यांनी भेट दिली .
यावेळी कोटेश्वर विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती विभा साबळे यांनी प्रस्ताविक केले . अटल लॅबचे इनचार्ज श्री लक्ष्मण उबाळे यांनी अटल लॅब विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना अत्याधुनिक विज्ञान व यंत्रणा याबाबत सविस्तर माहिती देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोटेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बरोबर विविध वैज्ञानिक उपकरणे अटल लॅबच्या मदतीने तयार केली. तसेच विद्यालयात चालू असलेले वेगवेगळ्या उपक्रमाची जिज्ञासा पोटी माहिती घेतली .
श्री कोटेश्वर विद्यालयातील योगा वर्ग, कलादालन, प्रयोगशाळा, व्यायाम शाळा, क्रिडागण याची विद्यार्थी व नवोदय विद्यालयातील प्रमुख मार्गदर्शक यांनी पाहणी केली . प्राध्यापक श्री रोहित आलुवालिया यांनी शाळेच्या विविध उपक्रमाविषयी कौतुक व्यक्त केले . तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षे संदर्भात मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमासाठी श्री कोटेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक श्री भुजंगराव जाधव . शाळेच्या प्राचार्या श्रीमती विभा साबळे ,अटल लॅबचे इनचार्ज श्री लक्ष्मण उबाळे , श्री अजितकुमार टंकसाळे, कला शिक्षक श्री सचिन जगताप, श्री योगेश यादव, अटल प्रशिक्षक श्री चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे आभार श्री कृष्णात बल्लाळ सर यांनी मानले .
_———————————————
फोटो —
मार्गदर्शन करताना प्रा रोहित सिह आलुवालिया, संस्था संचालक भुजंगराव जाधव, प्राचार्या विभा साबळे, लक्ष्मण उबाळे , बल्लाळ सर व इतर मान्यवर (छाया – निनाद जगताप, सातारा)