ताज्या घडामोडी

मेढा:-मंत्र्यांनी एस.टी.बस मधून जावळीत तीस वर्षाने केला प्रवास…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

मंत्र्यांनी एस.टी.बस मधून जावळीत तीस वर्षाने केला प्रवास…

मेढा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील मेढा- सातारा – विजापूर या महामार्गावरील नवीन एस.टी बस चा प्रवास करून तीस वर्षाने जावळीत मंत्र्यांनी प्रवास केल्याची नोंद महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या खात्यात झालेली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा व जावली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार तथा कॅबिनेट मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून जावळी तालुक्यातील मेढा एस.टी. आगारामध्ये नवीन १० बसेस चा ताफा मिळालेला आहे. यामुळे प्रवासी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
महाराष्ट्राचे वजनदार मंत्रीमहोदय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या बस मध्ये प्रवास करून आमदारांसाठी असणाऱ्या एस टी सवलतीचा लाभ घेतला. नवीन बस मध्ये प्रवास करताना वाहक श्रद्धा बर्गे यांनी मंत्री महोदयांना एस.टी. बसची सवलत तिकीट दिली. या ऐतिहासिक क्षणाच्या वेळेला सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे, वाहतूक नियंत्रक ज्योती गायकवाड, तसेच जावळी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते कांतीबाई देशमुख ,पांडुरंग जवळ ,संतोष वारागडे, गीता लोखंडे, दत्ता पवार यांच्यासह सायगाव, कुडाळ, मेढा, करंजे तसेच कोयना व कण्हेर धरणाच्या पुनर्वसनामुळे पंढरपूर भागामध्ये ज्यांचे पुनर्वसन झाले असे अनेक प्रवासी व सामाजिक कार्यकर्ते यांनी यावेळी उपस्थिती दाखवून आनंद व्यक्त केला.
साक्षात आपल्या सोबत एक कॅबिनेट मंत्री प्रवास करत असल्याचा सुखद अनुभव प्रवाशांनी घेतला. या वेळेला मंत्री महोदयां सोबत आपली बीच मी छबी चमकावी म्हणून काही ठेकेदार बस मध्ये शिरले होते. त्यामुळे एसटी अधिकाऱ्यांना बाजूला उभे राहावे लागले. अशी माहिती प्रवाशांनी दिली.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

——————————————–
फोटो -जावळी तालुक्यातील मेडा आगारातून नवीन एस टी बसने प्रवास करताना मंत्री (छाया- निनाद जगताप, सायगाव )

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button