वाई दि.23 किसन वीर माजी विद्यार्थी संघाची वाई तालुका माजी सैनिकांना मदत.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
वाई दि.23
किसन वीर माजी विद्यार्थी संघाची वाई तालुका माजी सैनिकांना मदत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आदेशानुसार किसन वीर महाविद्यालय एन.एस.एस. व एन.सी.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथे ‘माती को नमन वीरोंको नमन’ असा उपक्रम घेऊन वाईतील १९६५ व १९७१ च्या युद्धात सहभागी झालेले व वाई शहरात राहणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान सोहळा घेण्यात आला.
सदर सन्मान सोहळ्यात माजी सैनिकांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना माजी सैनिक संघटनेचे अध्यक्षांनी संघटनेच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी व्यक्त केल्या आणि ऑफिस काजकाजासाठी सैनिकांना जमिनीवर बसून काम करावे लागते त्यासाठी खुर्च्यांची आवश्यकता व्यक्त केली. त्यास अनुसरून किसन वीर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ५० खुर्च्यांची सोय करून दिली.
वाई तालुका माजी सैनिक पेंशनर संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी या सहकार्याबद्दल मा. मदनदादा भोसले यांचे आभार मानले. माजी सैनिकांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अनेक प्रश्न आहेत, त्यांचा निपटारा करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. त्याला काही अंशी यशही येत आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी मा. मदनदादा भोसले म्हणाले, माजी सैनिकांच्या देशसेवेचा सन्मान करणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो. या लोकांनी देशाच्या सीमेवर अहोरात्र खडा पहारा दिल्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमची संस्था व माजी विद्यार्थी संघ अग्रेसर असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ संचालक केशवराव पाडळे, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, रोहिदास पिसाळ, दिपक ननावरे, पत्रकार दत्ता मर्ढेकर, भद्रेश भाटे, धनंजय घोडके, पांडुरंग भिलारे, संजीव वरे, विश्वास पवार, अशोक येवले, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.