ताज्या घडामोडी

गंगापूर:-मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दि २५ सांवगी चौक व दि २६ लिंबे जळगाव येथे रस्तारोखो व जलसमाधी आंदोलन.

पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

RPS STAR NEWS

मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दि २५ सांवगी चौक व दि २६ लिंबे जळगाव येथे रस्तारोखो व जलसमाधी आंदोलन.

अखंड मराठा समाज ता.गंगापुर च्या वतीने दि 23/09/2024 मा.तहसीलदार गंगापुर यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री व ग्रहमंञी महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या आदरणीय मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे ८ दिवसापासून आमरण उपोषण सुरु आहे. टमनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून तात्काळ निर्णय घ्यावा.आंतरवाली येथे सुरू असलेल्या आंदोलनास अखंड मराठा समाजा गंगापुर वतीने खंबीर पाठिंबा देत आहोत.

मनोज जरांगे पाटील हे आंतर वली सराटी येथे आमरण उपोषणासाठी बसलेले असतांना दोन समाजात मुद्दामहून तेढ निर्माण होण्यासाठी काही लोक आंतरवली सराटी कडे जाणारा मुख्य रस्ता रोखुन दादागिरी करत आहेत.त्याच प्रमाणे छञपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले झेंडे फाडून मराठा आणि obc समाजात गालबोट लागेल असे कृत्ये करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करून अटक करावे.
आंतरवली येथे सुरू आमरण उपोषण दरम्यान संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास तसेच मागण्याकडे दुर्लक्ष करत असलेल्या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी दि २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११वाजता सांवगी चौक लासुर स्टेशन येथे रस्ता रोखो आंदोलन व दि २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११वाजता लिंबे जळगाव फाटा पुलाजवळ जलसमाधी व रस्ता रोखो आंदोलन करण्यात येणार आहे. वरील दोन्ही आंदोलनाला परिसरातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अखंड मराठा समाज ता.गंगापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी मराठा स्वयंसेवक विठ्ठल कुंजर, आण्णासाहेब जाधव, इंजी.महेशभाई गुजर, राहुल ढोले, राहुल सुरासे, संदीप थोरात, नितीन कांजणे, राजेंद्र इनामे विठ्ठल मस्के, प्रसाद शेगुळे,नानासाहेब पवार, योगेश तायडे, संजय पवार, दत्तू पवार, बाळासाहेब सोमासे,वैभव चव्हाण,सुभाष नरोडे, संभाजी कानडे आदेशा रनयेवले,सोमनाथ दुबिले धरमसिंग बिंमरोट,आकाश भगुरे, राज धणे, प्रसाद शेंगोळे,अक्षय चव्हाण आदी मराठा स्वयंसेवक उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button