आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भुईंज:-निर्माण संस्थेमार्फत किशोरवयीन मुलींच्या क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन.

पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष:-7447515129

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

निर्माण संस्थेमार्फत किशोरवयीन मुलींच्या क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन.

निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था निर्भया प्रकल्प, सातारा यांच्या मार्फत दिनांक ९ व १० सप्टेंबर २०२३ रोजी वाई तालुक्यातील भुईंज विभागामध्ये व १६ व १७ सप्टेंबर २०२३ रोजी सातारा तालुक्यातील नागठाणे विभागामध्ये २ दिवसीय किशोरवयीन मुलींसाठी (१३ ते १८ वयोगटातील) बलिका पंचायत गटाची क्षमता बांधणी कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळेसाठी वाई तालुक्यामधील भुईंज (भीमनगर, समतानगर), पाचवड, बेलमाची, भीरडाचीवाडी, अमृतवाडी येथील ६० पेक्षा अधिक व सातारा तालुक्यामधील नागठाणे, अतीत, सासपडे, बोरगाव, वर्णे, आबापुरी येथील भटके – विमुक्त समाजातील ५० पेक्षा अधिक किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. भुईंज येथील बालिका पंचायत क्षमता बांधणी कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी भुईंज गावचे विद्यमान सरपंच श्री. विजय वेळे व बेलमाची गावच्या विद्यमान सरपंच सौ. चैत्राली बोद्रे उपस्थित होते तसेच नागठाणे येथील बालिका पंचायत क्षमता बांधणी कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नागठाणे गावचे विद्यमान उपसरपंच श्री. अनिल साळुंखे उपस्थित होते.
कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून श्री. दिगंबर बिराजदार (Dignity Academia) हे उपस्थित होते. श्री. दिगंबर बिराजदार यांनी बाल हक्क, बाल विवाह, आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले व अनेक नवनवीन खेळाच्या माध्यमातून मुलींच्या गटाचे कुतूहल वाढवण्याचे काम केले. तसेच विविध शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून मुलींच्या सामाजिक ज्ञानात भर टाकण्याचे काम करण्यात आले.
या कार्यशाळासाठी निर्भया प्रकल्प सातारा चे जिल्हा समन्वयक विक्रांत मोरे, रमेश पुजारी, नम्रता खरात, सुचिता सातपुते, सायली पडवळ व चांदणी चंदनशिवे हे उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button