महाबळेश्वर तालुक्यातील मोबाईल टॉवर नुसतेच शोपीस… वीज पुरवठ्याअभावी सातत्याने बंद….
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
महाबळेश्वर तालुक्यातील मोबाईल टॉवर नुसतेच शोपीस… वीज पुरवठ्याअभावी सातत्याने बंद….
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ आणि अतिपावसाळी भागात मोबाईल टॉवर उभारले असले तरी, त्याला वीज कनेक्शन नसल्याने आणि फक्त सौर ऊर्जेवर अवलंबून असल्याने हे टॉवर फक्त शोपीस झाले असून असे टाॅवर असल्याने रेंजचा पुरता बोजवारा उडत आहे. त्यामुळे मोबाईल सेवा मोठ्या प्रमाणावर खंडित होत आहे. यामुळे स्थानिकांना संवाद साधणे, तातडीच्या परीस्थितीत मदत मागवणे आणि डिजिटल सुविधा वापरणे अशक्य होत आहे.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुलदिप शिवराम यादव यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, “आमच्या भागात पावसाळ्यात सलग ३ महिने सूर्याचे दर्शन होत नाही, हे नवीन नाही. सोलरवर चालणारे टॉवर या काळात बंद पडतात आणि नागरीक पूर्णपणे संपर्कहिन होतात. या समस्येवर वीज वितरण आणि बीएसएनएल यांनी तातडीने समन्वय साधून जेथे वीज कनेक्शन नाहि तेथे जोडणी करुन द्यावे.”
डॉ. यादव यांनी पुढे सांगितले की, “आमच्या या भागात प्रायव्हेट कंपन्या सेवा देऊ शकत नाहित. बीएसएनएल हा एकमेव पर्याय असून, तोही अपूर्ण अवस्थेत आहे.
आम्ही चिकाटीने १५ वर्षे सातत्याने प्रयत्न करून काहि विकासात्मक सुविधा मिळवल्या, पण आजही त्या पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहित. हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे.”
स्थानिक नागरीकांनीही यावर तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेषत: आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल नेटवर्क नसल्याने आरोग्य, बॅकींग, आपत्ती व्यवस्थापन आणि शिक्षण या सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, संबंधित विभागांनी अद्याप याबाबत ठोस भूमिका घेतलेली नसून, वीज कनेक्शनच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी स्थानिक प्रशासन, बीएसएनएल आणि वीज वितरण यांच्यातील समन्वय आणि बीएसएनएलची चांगली सेवाच या दुर्गम भागाला जगाशी जोडून ठेवणार आहे.
बीएसएनएलने कनेक्टिंग इंडीया या आपल्या ब्रीदवाक्यानुसार लोकांना चांगली सेवा देवून डिजिटल भारताशी जोडावे अशी अपेक्षा दुर्गम भागातील नागरिक व्यक्त करत आहेत.