पुसेसावळी परिसरात कडकडीत बंद, मराठा बांधवांच्या मागण्या मान्य करा.
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर:-7499265724

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर
पुसेसावळी परिसरात कडकडीत बंद, मराठा बांधवांच्या मागण्या मान्य करा.
पुसेसावळी . दि. 4/9/23 खटाव तालुक्यातील पुसेसावळी, राजाचे कुर्ले, पारगाव, गोरेगाववांगी , चोराडे, महासुर्णे, वडगाव, रहाटणी, शेनवडी या गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता तर काही गावा मध्ये चौका चौकामध्ये जमून एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा बाजी करत जालन्यात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. तरी जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली येथे लोकशाही मार्गाने मराठा आरक्षण मागणी साठी उपोषणास बसलेल्या मराठा बांधवांच्या वर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला याचा निषेध पुसेसावळी भागातून करण्यात आला.अन्याय झाला तर जात पात न पाहता मराठा समाज पेटून उठल्याशिवाय रहात नाही. हे ग्रामीण भागातील वास्तव आहे अन्यायाविरुद्ध लढणे हे मराठ्यांच्या रक्तात आहे. शांततेच्या मार्गाने उपोषण करणे गुन्हा असेल तर मराठ्यांची जात काय असते हे दाखवण्याची वेळ आली आहे. अशा भावना मराठा बांधवानी व्यक्त केल्या.