वाई :- पसरणी येथे आझादी का अमृतमहोत्सव या निमित्ताने पसरणी ग्रामपंचायत येथे आजी माजी सैनिकांना ध्वजारोहनाचा मान.
संपादक:- प्रल्हाद चव्हाण :-8208717483

वाई :-आज पसरणी येथे आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने पसरणी ग्रामपंचायत येथे आजी माजी सैनिक यांना ध्वजारोहनाचा मान देण्यात आला तसेच पद्मश्री ग्रामसंघ व महिला बचत गट अंगणवाडी सेविका,प्राथमिक शाळा . जि.प.शाळा आरोग्य विभाग पद्मश्री ग्रामसंघ महिला बचत गट यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली. पद्मश्री ग्रामसंघ महिला बचत गट यांच्या वतीने वीरपत्नी अस्मिता संजय महांगडे यांचा सत्कार करण्यात आला.बचत गटाच्या वतीने रांगोळी स्पर्धा, महिला आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले, तसेच महिला मेळावा घेण्यात आला, तसेच संगित खुर्ची घेण्यात आली, तसेच स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या. बक्षिस समारंभ घेण्यात आले. अंगणवाडी सेविका यांनी धाराऊमिशन माहिती दिली. तसेच पर्यावरण शपथ घेण्यात आली. पंचायत समिती.वाई. अभंग सर व फरांदे सर यांनी महिलांना उत्पादित गट बचत गटांविषयी मार्गदर्शन केले. महिलांनी खूप छान पद्धतीने उपस्थिती दाखवली तसेच ग्रामसंघाच्या वतीने जेवनाचे नियोजन केले.
पद्मश्री ग्रामसंघ अध्यक्ष – सारिका शिंदे
सचिव – पद्मा शिर्के
कोषाध्यक्ष – कविता महांगडे
लिपीका – मेघा येवले
ग्रामसंघ बॉडी
CRP –
अपर्णा शिर्के / भारती नेवसे .