
मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
पुणे रिक्षाचालकांचा मनमानी कारभार
पुणे, दि. 6 (अब्दुलरहिम शेख ) :- पुणे येथील रिक्षाचालकांच्या बेहिशोबी घेण्यात येणाऱ्या भाडेवाढमुळे स्वारगेट, पुणे स्टेशन, कोंढवा, कात्रज आदी बरेच ठिकाणाहून नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.
रिक्षाचालकांचा जास्त करुन रात्रीच्या वेळी प्रवाशांकडून मीटर वरील भाडे न आकारता डायरेक्ट मनात येतील ते आकडे सांगून प्रवाशांची दिशाभूल केली जात असून वेळेनुसार प्रवाशांच्या कडून आर्थिक लुटालूट केली जात आहे.
रात्रीच्या वेळी काहीच पर्याय नसल्याने नाइलाजाने प्रवासी रिक्षाचालकांना त्यांच्या तोंडातून निघालेल्या आकड्याला बळी पडत आहेत. हा असा जनतेला लुटण्याचा प्रकार किती दिवस चालणार ! याकडे जनमानसाचे लक्ष वेधून बसले आहे.
तरी संबंधितांनी याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहावे अन्यथा अशा या रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारामुळे जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.