आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

खटाव:-एक ध्ययवेडा प्रवासी – कुमार पिसाळ.

पत्रकार नितीन कुलकर्णी:-9307293406

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार नितीन कुलकर्णी

एक ध्ययवेडा प्रवासी – कुमार पिसाळ.

कुमार पिसाळ हा सुशिक्षीत बेरोजगार तरुण… धडपडणे, यशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हा त्याचा स्वभावगुण… एका कामासाठी तो मुंबई शहरात गेला असता पाय घसरून झालेल्या रेल्वे अपघातात त्याचा पाय गुडघ्यापासून निकामी झाला, काढून टाकावा लागला.

धडधाकट उमद्या तरुणाचे रूपांतर अपंग विकलांग शरिरात झाले, तरी मन मात्र विकलांग झाले नाही. ते इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावादने प्रेरित होते, आपले अपंगत्व कोणास ओझे होऊ नये म्हणून आपला स्वाभिमान जपण्यासाठी कुमारने स्वतःची रसवंती सुरु केली.

पाय जावून शरिर अपंग झाले होते पण दिव्य बनलेले मन स्वस्थ बसू देईना. तेव्हा आपल्या व्यवसायातून जमलेल्या पैशातून एक बाईक खरेदी करून घेतली आपल्या मित्रांना देशाटनचा मनोदय सांगीतला सर्वांनी त्याला पाठींबा दिला.
आपल्या मनाच्या निर्धाराचे दिव्यदर्शन त्याने वेळोवेळी घडवले आहे. त्याने मुंबई मॅरेथॉन मध्ये धावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आपल्यासारख्याच ध्येयवेड्या दिव्यांग मित्राच्या मदतीने त्याने महाराष्ट्रातील उंच पर्वतशिखर कळसूबाई सर केले आहे.

स्वर्गापेक्षा सुंदर देशात आपण जन्म घेतलाय, तो संपूर्ण भारत देश जवळून पहावा, येथील अनेक चालीरिती प्रत्यक्ष अनुभवाव्यात, अनेक भाषा-वेषभूषेने नटलेल्या देशाची विविधतेतेची संस्कृती प्रत्यक्ष अनुभवावी. राजस्थानमधील मऊमऊ वाळवंटावर फिरावे, हिमालयाच्या गर्द हिरव्या वनराई नजरेत टीपाव्यात, उचउंच पर्वतशिखरे चढावीत, भारत-पाक, भारत चिन सिमा सुरक्षीत ठेवणाऱ्या जवानांना सिमेवर भेटून त्यांना धन्यवाद द्यावेत, गंगा-सिंधू- ब्रम्हपुत्रेचेचे विशाल पात्र नजरेत साठवावे, भारतमाचे चरणतळ अखंड धुणाऱ्या त्रिसागरांना वंदन करावे. असेतू हिमालय भारतमातेचे दर्शन एका दिव्य नजरेत साठवण्यासाठी भारतभ्रमंतीस निघालेल्या आहे.
या प्रवासादरम्यान सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा संदेश, सुरक्षित प्रवास, गाडी चालवतांना अपघात होवू नयेत म्हणून जनजागृती करणे, दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण करन्यासाठी विश्रांती च्या गावी दीव्यांग व्यक्तीना भेटून त्यांना सक्षम होण्यासाठी प्रेरित करण्याचा मानस मनासी धरून कुमारने चोराडे जि.सातारा येथून एकट्याचा बाईक प्रवास सुरु केला आहे. हा प्रवास करणाऱ्या अवलिया तरुणास मनस्वी शूभेच्छा..

केंद्रे बी. टी.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button