ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पवना धरणातून ३५०० क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !…

प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ :-9960044802

पवना धरणातून ३५०० क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !…
मागील पाच ते सहा दिवस मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणारे पवना धरण ९७ टक्के भरले असल्याने धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून ३५०० क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. हा विसर्ग पावसाचे वाढते प्रमाण व परिस्थितीनुसार कमी अधिक करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्त हानी टाळण्यासाठी धरणा खालील नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे व आपली जनावरे,वाहने, औजारे सर्व काही सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने नागरिकांना केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button