श्रीगोंदा:-साकळाई योजनेसाठी जनआंदोलन,रास्ता रोको.
पत्रकार राधाजी व्यवहारे श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीगोंदा:-साकळाई योजनेसाठी जनआंदोलन,रास्ता रोको.

अहिल्यानगर /श्रीगोंदा : साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळून ६ महिने उलटले तरी भूमिपूजन व प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने साकळाई योजना कृती समितीतर्फे हिवरे झरे येथे दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पालकमंत्र्यांनी दिवाळीत भूमिपूजनाचे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता करावी, तसेच दुष्काळग्रस्त शेतकरी व पशुपालकांसाठी चारा छावण्या, चारा डेपो सुरू करून तातडीने अनुदान जाहीर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी असल्याचे समितीने स्पष्ट केले.
यावेळी अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. जलसंपदा विभागाचे उपअभियंता जयराम वाखरडे यांनी निवेदन स्वीकारून लवकरच मंजुरी प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू होईल, असे आश्वासन दिले.




