सुपने गावातील गेल्या 50 वर्षांपासून दुर्लक्षित असलेला रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण…
प्रतिनिधि:- मारुती सोमूत्ते कराड

सुपने गावातील गेल्या 50 वर्षांपासून दुर्लक्षित असलेला रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण…
भाजपचे नेते ,प्रदेश सचिव श्री विक्रमजी पावसकर बाबा यांच्या शिफारसीने व महाराष्ट्राचे माजी मंत्री मा श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निधीतून हे काम पूर्ण झाले…
सुपने गावचे नवीन गावठाण वसल्यापासून वार्ड क्र 3 मधील सिद्धनाथ मंदिर परिसरातील रस्त्यावर अजूनपर्यंत डांबरीकरणचा निधी आला न्हवता,गावातील जवळपास सर्वच भागात डांबरीकरण पूर्ण झाले होते,सदरची अडचण लक्षात घेऊन हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष श्री गणेश पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्याने सदरच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले..विक्रमजी पावसकर साहेबांनी सामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीचा विचार करून निधी आणून लोकांची अडचण दूर केली तसेच सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम केले….
सदर काम पूर्ण होण्यास तत्कालीन ग्रामसेवक,ग्रामपंचायत सुपने,अजिंक्य ग्रुप चे अध्यक्ष सागर पडवळ,तसेच अजिंक्य ग्रुप व हिंदू एकता आंदोलन चे सभासद यांचं विशेष सहकार्य लाभले…