सातारा जिल्ह्यात दि. २३ ते २७ ऑगस्ट अपंगा करिता मोफत जयपूर फूट कॅम्प आयोजित.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्ह्यात दि २३ ते २७ ऑगस्ट अपंगा करिता मोफत जयपूर फूट कॅम्प आयोजित.
सातारा दि: सामाजिक जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या
रोटरी क्लब ऑफ सातारा सात हिल्स, रोटरी क्लब सातारा सिटी ,रोटरी क्लब सातारा कॅम्प आणि रोटरी इलाईट कोरेगाव यांनी संयुक्तपणे तसेच समर्थकृपा फेडरेशन आणि रत्ननिधी फौंडेशनच्या वतीने अपंगा करिता मोफत जयपूर फूट कॅम्प सातारा जिल्ह्यात दि २३ ते २७ ऑगस्ट अपंगा करिता मोफत जयपूर फूट कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
यामध्ये पोलिओ ग्रस्तांसाठी कैलीपर्स किंवा क्रचेस
याशिवाय पाय व हात नसलेल्या दिव्यांगासाठी जयपूर फूट व कृत्रिम हात मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे .तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन केले आहे.
सदर कॅम्प सातारा जिल्ह्यात २३ ऑगस्ट रोजी वाई , डॉ मिरजकर हॉस्पिटल येथे
२४ ऑगस्ट रोजी शिरवळ, संतोबा कुबले हॉल येथे
तर २५ ऑगस्ट रोजी , हॉटेल श्रीमान ( जुने ) , न्यु आर टी ओ ऑफिस समोर ,सातारा आणि २६ व २७ ऑगस्ट कृष्णाबाई सांस्कृतिक कार्यालय ,कराड येथे सकाळी ११ ते ५ वेळेत होणार आहे. अशी माहिती डॉ सुनीता पवार आणि डॉ शंकर गोसावी यांनी दिली. या उपक्रमात समर्थ कृपा फौंडेशन सहभागी असून दिव्यांग व्यक्ती आपली माहिती जवळच्या रेशनिंग दुकानदाराकडे ही देऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क रोटरी क्लबचे पदाधिकारी
अजित करडे 9921380800,शशिकांत रसाळ 8208898863,विजय बाचुलकर 9421115560
प्रद्युम्न आगटे 9922507030 यांचेशी साधण्याचे आवाहन केले आहे.
————————————————————-
फोटो —