कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-पुसेसावळीत आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उद्योग मंथन शिबीर.

पत्रकार अनमोल गुरव खटाव तालुका:-9881355582

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अनमोल गुरव खटाव तालुका:-9881355582

पुसेसावळीत आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उद्योग मंथन शिबीर.

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे आज विक्रमबाबा सोशल फाऊंडेशनच्या वतीने मराठा समाजातील उद्योजकांसाठी नवीन अथवा चालु व्यवसाय वाढीसाठी बिनव्याजी कर्ज योजना अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनांची माहिती आढावा व उद्योग मंथन शिबीर आज (१९ ऑगस्ट ) रोजी दु.२.३० वा . दत्त मंगल कार्यालय येथे आयोजित केल्याची माहिती वर्धन अॅग्रो चे कार्यकारी संचालक विक्रमशिल कदम यांनी दिली.

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे व रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे हे या उद्योग मंथन शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट असुन या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक ना.नरेंद्र पाटील,अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे असुन भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची प्रमुख उपस्थिती आहे.तरी जास्तीत जास्त युवकांनी या उद्योग मंथन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन विक्रमबाबा सोशल फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button