वाई:-वाई आगाराला बस चालु करण्यासाठी दिले निवेदन.
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष:-8390501946

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष
वाई:-वाई आगाराला बस चालु करण्यासाठी दिले निवेदन.
आज वाई एसटी महामंडळाला एसटी बस चालू करण्यासाठी वाई एसटी आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला पिराची वाडी गावची एसटी कोरोना काळापासून बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे दळणवळणाचे साधन नसल्यामुळे प्रचंड हाल होत आहेत.
गेल्या शनिवारी सुलतानपूर या गावच्या इयत्ता सातवी शिकणाऱ्या कुमारी श्रावणी अहिवळे या तेरा वर्षाच्या मुलीचा एसटी अपघातात जीव गमावला.
आज ग्रामीण भागातील कॉलेजला जाणाऱ्या मुलांची संख्या धावडी पंचक्रोशीतील पिराचीवाडी कांबट वस्ती गुंडेवाडी वाघमाळ 50 ते 60 आहे आणि कॉलेज सुटण्याच्या वेळी सुलतानपूर ते बालेघर या वेळेमध्ये एक एसटी असल्यामुळे विद्यार्थी आणि प्रवासांचे प्रचंड हाल होत आहे तरी आगार प्रमुखांनी लक्ष घालून पिराचीवाडी गावाला पहिल्या तीन एसटी चालू होत्या. सकाळी साडेआठ व साडेदहा दुपारी साडेतीन परंतु गेले तीन वर्ष एसटीच्या फेऱ्या बंद झालेल्या आहेत तरी ग्रामस्थांची विनंती आहे की सकाळी साडेसहा एक फेरी व दुपारी दीड ते दोन च्या दरम्यान एक फेरी चालू करावी अशा आशयाचे निवेदन वाई एसटी आगार प्रमुखांना देण्यात आले यावेळी युवराज कोंढाळकर सचिन पाटणे संपत कोचळे चंद्रकांत मांढरे विशाल पोळ विशाल थोपटे राहुल धोंडे शुभम कोचळे उपस्थित होते.