ताज्या घडामोडी

महाबळेश्वर:-तापोळा हद्दीत महाबळेश्वर ते तापोळा मुख्य रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम – ठेकेदारावर कारवाईची मागणी.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

महाबळेश्वर:-तापोळा हद्दीत महाबळेश्वर ते तापोळा मुख्य रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम – ठेकेदारावर कारवाईची मागणी.

महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा हद्दीत महाबळेश्वर ते तापोळा मुख्य रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आलेले असून या कामाची वेळोवेळी तक्रार करून ही तर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.पत्रकार उत्तम भालेराव या जबाबदार व जागरूक नागरिकांनी जे संविधानाचे अभ्यासक असून यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्वर ते बांधकाम विभाग सातारा तसेच तहसीलदार यांच्याकडे बऱ्याच वेळा तक्रार देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी कामांमध्ये बेजबाबदार वागणाऱ्या ठेकेदारावर योग्य कारवाई न केलेने व समज न दिल्यामुळे महाबळेश्वर ते तापोळा या मुख्य रस्त्याचे काम जागोजागी वळीवाच्या पावसात खचून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.

आर.सी.सी. बांधकाम केलेले साईट वाॅल खचल्या मुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असून ह्याला जबाबदार कोण ?? तसेच रस्ता खचल्याने अपघात ही होवु शकतो, मोठा अनर्थ घडु शकतो याला जबाबदार कोण?? अशी चर्चा नागरिकांन मध्ये सुरू आहे. कोयना ,सोळशी,कांदाटी हा १०५ गावचा मुख्य रस्ता असुन महाबळेश्वर कारवी आळा ते भीमनगर जागोजागी खचल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ व येनारे पर्यटक भयभीत झाले आहेत.तरी जनतेची लुटमार करनाऱ्या , फसवणूक करणाऱ्या बेजबाबदार वागणाऱ्या ठेकेदारास मोका अंतर्गत कारवाई करून काळ्या यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे अशी नागरीकांनी मागनी केली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

RPS STAR NEWS संपादक प्रल्हाद चव्हाण

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button