श्रीरामपूर:-नाऊर मध्ये हर घर तिरंगा अभियान.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर:-9921435437

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर
नाऊर मध्ये हर घर तिरंगा अभियान.
नाऊर (वार्ताहर ) : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सोन्याबापू शिंदे हे होते. याप्रसंगी गावातील भारतीय सेनेत ( फौजमध्ये ) कार्य करून सेवानिवृत्त झालेल्या रिटायर आर्मी जवान बापूसाहेब अशोक गहीरे,संजय भाऊराव अहिरे आणि विनायक सोन्याबापू शिंदे या तिनही आर्मी जवानांचे पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन जेष्ठ नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गाव सुशोभीकरण करण्यासाठी व वृक्ष लागवड करण्याची सुरवात करण्यात आली. ग्रामस्थांना तिरंगा ध्वजा चे वितरण करण्यात आले या सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच सोन्याबापू शिंदे, उपसरपंच मुसाभाई पटेल, किशोर नांगळ, विठ्ठल गहिरे,दत्तात्रय नांगळ, स्वस्त धान्य वितरक कैलास राशिनकर, अशोक गुंड,संजय धनवटे, प्रताप वावरे , कैलास देसाई,अनिकेत देसाई,किशोर त्रिभुवन, बिबन पटेल, रामभाऊ नानेकर, चंद्रकात गहीरे,विठ्ठल गहिरे, दिपक देसाई, पत्रकार दिपक गायकवाड डॉ.सौ.शिंदे व अँड सौ. शिंदे मॅडम तसेच नाऊर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
हर घर तिरंगा अभियान अंतर्गत प्रत्येकाने आपापल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा असे आवाहन सरपंच सोन्याबापू शिंदे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषदे शाळेच्या वतीने गावातुन फेरी काढून हर घर तिरंगा अभियान जागृती करण्यात आली.