सातारा:-ऍक्युवेट ऑटोमेशन कंपनीला रयत स्वाभिमानी संघटनेचा दणका -15 कामगारांची नऊ लाख 69 हजारांची थकीत देणी देण्यास पाडले भाग ; प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांचे कामगारांनी मानले आभार.
सह -संपादक अशितोष चव्हाण:-7378619519

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह -संपादक अशितोष चव्हाण
ऍक्युवेट ऑटोमेशन कंपनीला रयत स्वाभिमानी संघटनेचा दणका -15 कामगारांची नऊ लाख 69 हजारांची थकीत देणी देण्यास पाडले भाग ; प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांचे कामगारांनी मानले आभार.
सातारा/ प्रतिनिधी
पुण्यातील ऍक्युवेट ऑटोमेशन अँड सोल्युशन प्रा. लि. या कंपनीने विविध 17 कामगारांची थकवलेली देणे देण्यास रयत स्वाभिमानी संघटनेने भाग पाडले असून संघटनेच्या दणक्यामुळे संबंधित कामगारांना कंपनीने 9 लाख 69 हजार 95 रुपये दिले आहेत. कष्टकरी कामगारांसाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार व सहकाऱ्यांनी घेतलेल्या ठोस भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून संबंधित कामगारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सागरदादा पवार यांचे आभार मानले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील ऍक्युवेट ऑटोमेशन अँड सोल्युशन प्रा. लि. या कंपनीतील 15 कामगारांवर ग्रॅज्युएटी, वार्षिक बोनस व रजेचा पगार या हेडखालील सुमारे नऊ लाख 69 हजार 95 रुपये इतकी रक्कम देणे बाकी होती. कंपनीच्या प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही संबंधित कंपनी कामगारांना त्यांचे देणे देत नव्हती त्यामुळे अन्यायग्रस्त 15 कामगारांनी रयत स्वाभिमानी संघटनेकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटून कामगारांच्या अन्यायाचा पाढा वाचला होता अन्यायग्रस्त कामगारांना त्यांचे हक्काचे, कष्टाचे व घामाचे पैसे न दिल्यास ‘सळो की पळो’ करून सोडू, असा इशाराही दिला होता. कंपनीशी कामगारांनी केलेल्या पत्रव्यवहार व अन्य कागदपत्रांची होळी करू, कंपनीला टाळे ठोकू व कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी वाटेल ती भूमिका घेऊ, असे सागरदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते. तसेच ऍक्युवेट ऑटोमेशन अँड सोल्युशन प्रा.लि. या कंपनीच्या आडमुठेपणाबद्दल कामगार आयुक्त व शासन दरबारी योग्य त्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी सागरदादा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपर्क साधून कामगारांच्या व्यथा मांडल्या होत्या. रयत स्वाभिमानी संघटनेच्या आक्रमक भूमिकेपुढे संबंधित कंपनी नमली व त्यांनी संबंधित कामगारांचे न्याय देणे देण्याचे कबूल केले व तातडीने संबंधित पंधरा कामगारांच्या खात्यावर नऊ लाख 69 हजार 95 रुपयांचे कायदेशीर देणे वर्ग केले. संबंधित कामगारांना त्यांचे घामाचे पैसे बुडणार अशी शंका वाटत होती. मात्र रयत स्वाभिमानी संघटनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांचे हक्काचे पैसे मिळाल्याने कामगार संघटनेसह सर्वच कामगार व त्यांच्या कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त होत आहे. सागरदादा पवार यांनी कामगारांसाठी ठोस भूमिका घेऊन त्यांचे पैसे मिळवून देण्यात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांचे संबंधित कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी आभार मानले आहेत.
चौकट अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करू : सागरदादा पवार कोणत्याही कंपनीमध्ये किंवा आस्थापनेमध्ये कामगारांना त्रास होत असेल, त्यांची पिळवणूक केली जात असेल, व त्यांचे हक्काचे पैसे देण्यात चालढकल केली जात असेल तर संबंधितांनी रयत स्वाभिमानी संघटनेच्या सातारा येथील विसावा नाक्यावरील कार्यालयात (मोबाईल नंबर 9158 30 4141) संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू, असे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
आपलाच:- अभय जाधव रयत स्वाभिमानी संघटना सातारा जिल्हा सचिव