ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छ. संभाजीनगर:-मोबदला घेतला तरीही अतिक्रमण मग काय थेट जेसीबी फिरवला.

पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर:-7397937231

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर

छ. संभाजीनगर :-औरंगाबाद खंडपीठाने फटकारल्यानंतर संभाजीनगर महानगरपालिकेने मागील काही काळात सिडको भागात अतिक्रमानाविरोधात कारवाई केली होती मात्र काही दिवसा पासून ही कारवाई तुरळक ठिकाणी होताना दिसत आहे अशातच आता महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधक विभागाच्या पथकाने लक्ष्मण चावडी चौक ते कैलास नगर स्मशानभूमी डीपी रस्त्यावरील 15 अतिक्रमणे काढली आहेत यावेळी पोलिसांचा देखील बंदोबस्त पाहावयास मिळाला विशेष म्हणजे अतिक्रमण धारकांना याचा मोबदला देऊन अतिक्रमण काढण्यात आले होते परंतु त्यांनी पुन्हा अतिक्रमण केल्याने ही कार्यवाही करण्यात आली महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत लक्ष्मण चावडी व पुढील चौकापर्यंत 80 फूट आणि नंतर 60 फूट डीपी रस्त्यावरील एकूण 15 बाधित मालमत्ता निष्काशीत करण्यात आल्या होत्या या बाधित मालमत्ता यापूर्वीही 2021 निष्काशीत करण्यात आल्या होत्या तसेच काही नागरिकांना याचा मोबदलाही देण्यात आला होता त्यानंतर देखील या लोकांनी रस्ता न झाल्याने पुन्हा अतिक्रमणे करून दुकाने थाटली होती या रस्त्यावर कैलास नगर स्मशानभूमी असल्याने नेहमी वरदळ असते त्यामुळे वाहतुकीला नेहमी अडथळे येत होते याबाबत मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी नुकतीच या रस्त्याची पाहणी केली होती लगेच स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरू झाल्याने मागील आठवड्यात अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी तसेच उपायुक्त सविता सोनवणे या रस्त्याची पूर्ण पाहणी करून नागरिकांशी चर्चा करून आपापली अतिक्रमणे सूचना केल्या होत्या काही नागरिकांनी स्वतः होऊन टपऱ्या वगैरे व लोखंडी शेड वगैरे काढले होते परंतु माती व कच्चा विटा वापरून केलेले बांधकाम काढत नव्हते प्रथम नागरिकांना एक तासाचा अवधी देऊन त्यांच्या दुकानातील मूल्यवान वस्तू व घरातील वापरण्यायोग्य सामान काढून देण्यात आले त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने सर्व अतिक्रमणे निष्का शीत करण्यात आले अतिक्रमणामध्ये नागरिकांनी मोबाईलचे दुकान तसेच कटिंग चे इलेक्ट्रिक वस्तू रिपेरिंग चे दुकान भाजी विक्रेते तसेच चिकन व मटणाचे दुकाने होते काही लोकांनी तर राहण्यासाठी खोल्या ही बांधल्या होत्या व काही लोकांनी या ठिकाणी बांधकाम करून भाड्याने दिले होते आणि स्वतः दुसऱ्या ठिकाणी राहत होते सलग दोन दिवस चालणारी ही कार्यवाही काल सोमवारी लक्ष्मण चावडी ते कैलास नगर जाणाऱ्या रस्त्याची डाव्या बाजूचे अतिक्रमण काढण्यात आली होती.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button