ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

साताऱ्यात जलमंदिरचे झाले जनमंदिर.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यात जलमंदिरचे झाले जनमंदिर.

सातारा दि: महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी बारा वाजता महाविकास आघाडीचे बारा वाजवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात निघाले होते. यावेळी त्यांच्या ऐतिहासिक जलमंदिर या निवासस्थानाचे अक्षरशा जनमंदिर झाले. सर्वत्र जनतेचा एक आवाज घुमत होता. एकच नेता… एकच आवाज… उदयनराजे.. उदयनराजे.. या जयघोषाने संपूर्ण सातारा शहर दणाणून गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे स्वतः उपस्थित राहिल्याने आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते प्राचार्य यंत्रणेच्या एक भाग बनले आहेत.
जलमंदिर या ठिकाणच्या श्री चे पूजन करण्यापूर्वी साताऱ्यातील सर्व युगपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची त्यांनी शिवप्रतीज्ञा केली.
आज सकाळी आठ वाजल्यापासूनच सातारा शहर व तालुका, जावळी, कराड, पाटण, कोरेगाव, वाई ,महाबळेश्वर, खंडाळा व खटाव तालुक्यातील काही भागातून मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे सर्व प्रचारक व कार्यकर्ते एकत्र जमले होते. विशेष बाब म्हणजे सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्या भोवती कार्यकर्ते व प्रचारकांनी मोठी गर्दी केली होती. तशीच गर्दी जल मंदिरात पाहण्यास मिळाली . पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जसं सागर तयार होतो. तशा पद्धतीने या जन मंदिरात जनतेच्या आवाज व फटाक्याची आतिषबाजी यामुळे जलमंदिर मंदिरातील भाविक जनतेने जन मंदिरातच अभिषेक करून या विजयाचे कमळ फुलवले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केलीहोती .आज पावणे चारशे वर्षांनी पुन्हा एकदा दुसऱ्या स्वतंत्र्याच्या लढाईसाठी व देश अभिमान व देशा प्रती समर्पण करण्यासाठी आधुनिक स्वातंत्र्यसैनिक पाहण्यास मिळाले. जिकडे पहावे तिकडे जनसागर लोटला होता. यातूनच निकाल स्पष्ट झाला असून आज खऱ्या अर्थाने गुरुवार ही श्री दत्ताचा वार आहे. त्याचप्रमाणे लोकशाही मधील संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री त्याचबरोबर महायुती व घटक पक्षाचे प्रमुख तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा पद्धतीने लोकांनी लोकांसाठी सुरू केलेले लोकराज्य म्हणजे लोकशाहीचे व्याख्या या ठिकाणी पाहण्यास मिळाली.
बैलगाडी ही ग्रामीण भागाचे प्रतीक आहे. या बैलगाडीत बसून आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या रॅलीला धुमधडाक्यात सुरुवात केली. त्यांना शुभेच्छा व पाठिंबा व्यक्त करण्यासाठी १५० ते २०० प्रमुख संघटनेचे पदाधिकारी ,भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व शेतकरी संघटना व घटक पक्षातील अनेक मान्यवर स्वतः पायी रॅलीत सामील होऊन जयघोष करत होते. सुनील काटकर काका धुमाळ जितू खानविलकर चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व जावली तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमित कदम, सागर भोगावकर तालुका अध्यक्ष साधू चिकणे यांच्यासह मच्छिंद्र शिरसागर, वसंतराव मानकुंबरे जयदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
ढोल ताशाच्या निनाद व जन सागराचा उदंड प्रतिसाद यामुळे सर्वजण आत्मविश्वासाने वावरत होते. स्वतः राजमाता कल्पना राजे भोसले यांनी सुद्धा या अभूतपूर्व गर्दी पाहून सर्वच कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद दिले. विजय दिसून आला असला तरी महाराष्ट्रात मताधिक्याने निवडून येणारी सातारची जागा याची नोंद व्हावी. अशी अपेक्षा व्यक्त केली. जल मंदिरा शेजारील गडकर आळीतील बैलगाडीतून खऱ्या अर्थाने रॅलीला सुरुवात झाली. त्यावेळेला स्वतः श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी ही लोकशाहीची बैलगाडी सदैव मार्गक्रमण करेल. असा सार्थ विश्वास व्यक्त करून सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले . तरुणांचा उत्साह व ज्येष्ठ शेतकरी बंधूंचा आशीर्वाद लाभल्याने खऱ्या अर्थाने जल मंदिरात कमळ फुलले आहे हे सिद्ध झाले.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button