खटाव:-पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच भगवा ध्वजाचे अनावरण संपन्न-चोराडे येथे उभारला 70 फुट उंच भगवा ध्वज.
पत्रकार नितीन कुलकर्णी:-9307293406

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नितीन कुलकर्णी
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच भगवा ध्वजाचे अनावरण संपन्न-चोराडे येथे उभारला 70 फुट उंच भगवा ध्वज.
पुसेसावळी –
दि. ३० जुलै रोजी खटाव तालुक्यातील चोराडे या गावी श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच भगव्या ध्वजाचे अनावर करण्यात आले. जवळपास ७० फूट उंचीच्या या ध्वजाचे अनावरण हिंदू एकता आंदोलन अध्यक्ष मा.श्री.विक्रमबाबा पावसकर व वेताळभक्त श्री.दादामहाराज गोरेगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खटाव तालुक्यातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी बहुसंख्येने उपस्थित होते. चोराडे गावचा आदर्श इतर गावांनी सुद्धा घ्यावा व श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या संकल्पानुसार गावोगावी भगव्या ध्वजाचे अनावरण व्हावे असे मत विक्रम बाबांनी बोलताना व्यक्त केले. या वेळी विक्रम पावसकर म्हणाले अखंड हिंदुस्थानात परम पवित्र भगवा ध्वज स्तंभ उभा केला पाहिजे,आता हिंदू जागा झाला आहे , आणि जे झोपलेले आहेत त्यांनी लवकर जागे होण्याची वेळ आली आहे, लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या,याच्यावर आवाज उठवला पाहिजे, अशा लोकांना वेळीच ठेचले पाहिजे, त्यासाठी जातीपातीच्या भानगडीत न पडता हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे, त्यासाठी आपण बोलवाल तिथं येतो, मार्गदर्शन केले.
यावेळी खटाव तालुक्यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, चोराडे गावातील ग्रामस्थ शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक प्रथमेश पिसाळ तर आभार राहुल साळुंखे यांनी मानले.