वाई पोलिसांची सरस कामगिरी! ४ लाखांचा ‘राणीहार’ शोधून मालकाच्या गळ्यात परत.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

वाई पोलिसांची सरस कामगिरी! ४ लाखांचा ‘राणीहार’ शोधून मालकाच्या गळ्यात परत.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
वाई दि. २६ : हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळेल, ही आशा जवळपास मावळलेली असतानाच वाई पोलीस ठाणे यांच्या कार्यतत्परतेमुळे एका कुटुंबाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला आहे. तब्बल ४ लाख रुपये किमतीचा अडीच तोळ्याचा सोन्याचा ‘राणीहार’ शोधून पोलिसांनी तो सन्मानाने मूळ मालकाकडे सुपूर्त केला.
तक्रारदार महेश अरविंद मोहिते यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्नीचा मौल्यवान राणीहार गहाळ झाल्याची तक्रार नोंदवली होती. या घटनेमुळे मोहिते कुटुंब चिंतेत होते.
तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस अंमलदार विक्रम धोत्रे यांनी चिकाटी, तांत्रिक तपास आणि परिसरातील माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली.
अखेर २६ फेब्रुवारी रोजी हा मौल्यवान दागिना शोधण्यात यश आले. पोलिसांनी तो महेश मोहिते यांच्याकडे अधिकृतरीत्या सुपूर्त केला. हरवलेला दागिना सुखरूप परत मिळाल्याने मोहिते कुटुंबाने आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
ही संपूर्ण कारवाई सातारा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, वाई पोलिसांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




