श्रीरामपूर मध्ये विना नंबर प्लेट,काचांवर ब्लॅक फिल्म , त्याचप्रमाणे मॉडिफाइड सायलेन्सर लावलेल्या वाहनांवर कारवाई.
पत्रकार आदिनाथ कडू राहाता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्रीरामपूर मध्ये विना नंबर प्लेट,काचांवर ब्लॅक फिल्म , त्याचप्रमाणे मॉडिफाइड सायलेन्सर लावलेल्या वाहनांवर कारवाई.

श्रीरामपूर शहरामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये मुख्यत्वे करून विना नंबर प्लेट वाहने, ब्लॅक फिल्म लावण्यात आलेली वाहने व मॉडिफाइड सायलेन्सर लावण्यात आलेली दुचाकी वाहने यांच्यावर कारवाया करण्यात आल्या.
या मोहिमेदरम्यान एकूण 89 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विना नंबर प्लेटची वाहने विविध गुन्ह्यात वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे वाहनांच्या काचांवर ब्लॅक फिल्म लावण्या वर देखील मनाई आहे असे असतानाही काही वाहन चालक सर्वच काचांवर ब्लॅक फिल्म लावतात. आगामी निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर वरील दोनही प्रकारच्या वाहनांवर अर्थात विना नंबर प्लेट वाहने व ब्लॅक फिल्म लावण्यात आलेल्या वाहनांवर मोटर वाहन कायद्याखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये 13 चार चाकी वाहनांवर ब्लॅक फिल्म लावण्यात आलेल्या मिळून आल्या या सर्व वाहनांच्या ब्लॅक फिल्म जागेवरच काढून टाकण्यात आल्या व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच मॉडिफाइड सायलेन्सर लावण्यात आलेल्या 5 दुचाकी वाहनांवर देखील कारवाई केली. मॉडिफाइड सायलेन्सर च्या कर्ण कर्कश आवाजाचा त्रास विद्यार्थी,सिनिअर सिटीजन, तसेच जवळून जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. ही वाहने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली व मूळ सायलेन्सर बदलून मगच सोडण्यात आली.
सदरच्या कारवाई सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे सूचनेनुसार, पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम श्रीरामपूर शहर, शिर्डी येथील वाहतूक शाखेचे कर्मचारी, तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे कर्मचारी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्याकडील RCP पथक यांनी केली आहे.




