सातारा:-अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वास मोहिते यांची तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब कांबळे यांची निवड.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वास मोहिते यांची तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब कांबळे यांची निवड.
महाराष्ट्र राज्य अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या अध्यक्षपदी तिरंगा रक्षक चे संपादक आणि आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांची तर उपाध्यक्षपदी शिराळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे यांची निवड करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव भिसे होते.
यावेळी खालील प्रमाणे कार्यकारी निवडण्यात आली. दिलीप सकटे-उपाध्यक्ष सातारा, कार्याध्यक्ष एडवोकेट अंश खलीपे सांगली, सरचिटणीस संपतराव मोहिते कराड, कार्यकारिणी सदस्य मनीष कर्चे जालना, पोपटराव भिसे खंडाळा सातारा,दिनेश झाडे चंद्रपूर, पिराजी थोरवडे वाळवा सांगली, दिलीप महाजन कराड सातारा, चंद्रकांत जाधव पाटण सातारा, मुकुंद गोळे सातारा,रमेश जावळे सांगली, शांताराम थोरात कराड सातारा, सागर जाधव म्होप्रे सातारा,अतुल सोनावले सातारा,कृष्णत मोहिते पाटण सातारा, प्रथमेश गायकवाड अंगापूर सातारा आदींची निवड करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना अध्यक्ष विश्वास मोहिते म्हणाले, महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी चे कार्यक्रम नक्कीच केले पाहिजे परंतु त्याचबरोबर महापुरुषांचे विचार आणि चरित्र सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे. महापुरुषांना कोणत्याही जातीच्या कोंढवाड्यात न अडकवता मानवतावादी विचार जनतेपर्यंत पोहोचवणे काळाची गरज आहे.स्वागत प्रास्ताविक कृष्णत मोहिते यांनी केले तर आभार प्रथमेश गायकवाड यांनी मानले.