सातारा:-सातारा जिल्हा परिषदेमध्ये लाख मोलाची यंत्रणा धूळ खात पडून.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्हा परिषदेमध्ये लाख मोलाची यंत्रणा धूळ खात पडून.
सातारा दि: स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निर्मिती केली. या पाठीमागे स्थानिक पातळीवर विकास कामांना गतीने प्राधान्य मिळावे. हा हेतू होता. परंतु ,सध्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये लाख मोलाची यंत्रणा धुळखात पडून असल्याची बाब समोर आली आहे.
सध्या महााष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका यांची मुदत संपूनही निवडणुका होत नसल्याने प्रशासकीय कारभार सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. त्यामुळे जाब विचारणारे लोकप्रतिनिधी नसल्याचा फायदा आता काही जण खुलेआम घेऊ लागलेले आहेत. सातारा जिल्हा परिषदेचा खूप मोठा गाजावाजा व नावलौकिक असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक बाबी उघडकीस येत आहे. त्यामध्ये शासकीय मालमत्तेचा उपयोग होत नसून अनेक यंत्रणा धूळ खात पडून आहेत .त्यामुळे शासकीय निधी वाया जात असल्याची टीका सातारा जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त भेट देणारे ग्रामस्थ करत आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सातारा जिल्ह्याचे कन्या शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा असावी. अशी मागणी अनेक मुली व महिलांनी केलेली आहे. परंतु ती प्रतिमा नसली तरी शिक्षण क्षेत्रातील देवी म्हणून सरस्वतीची पूजा केली जाते. दुर्दैवाने शिक्षण विभागातच सरस्वती पूजन होत नाही. कट आउट कडे दुर्लक्ष होत आहे. त्याच्या शेजारी पडून असलेली झेरॉक्स यंत्रणा कार्यरत होण्यासाठी मेकॅनिक बोलवून त्याची दुरुस्ती केल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. ही साधी बाब आहे. पण, याकडे अनेकांचे दुर्लक्ष आहे.
वास्तविक पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये किंवा अर्थ विभाग पूर्वीसारखा स्थानिक स्वराज्य संस्थेला निधी उपलब्ध करून देत नाही. काटेकोरपणाने निधीचा वापर करावा.शासकीय कार्यालयातील दिवे , ए सी पंखे कोणी हजर नसतील तर ते बंद करावे. असा शासनाचा अध्याय आदेश आहे. परंतु, आपली ती जबाबदारी नाही. अशा पद्धतीने सातारा जिल्हा परिषदेमध्ये काही अधिकारी, कर्मचारी वागतात. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचे वीज बिल वाढत आहे. काही अधिकारी- कर्मचारी एवढे प्रामाणिक आहेत की, ते आपल्या केबिनच्या बाहेर जाण्यापूर्वी आवर्जून वीज पुरवठा बंद करतात. त्यांच्या चांगुलपणामुळेच सातारा जिल्हा परिषदेला एक चांगला दर्जा मिळालेला आहे. पण, आता बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे निधीचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे .खरं म्हणजे शासकीय कार्यालयातील साहित्य व त्याची मोजणी करणे आवश्यक आहे. तसेच त्याचे जतन करणे आवश्यक आहे. सातारा जिल्हा परिषदेला नेमका त्याचा विसर पडलेला आहे .
आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदी असताना लक्ष्मणराव पाटील यांचे वास्तव्य असलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यामध्ये होते . त्याठिकाणी एक नक्षीदार टेबल होता. तो टेबल नंतर अचानक गायब झाला. तो टेबल नेमका कुठे गेला? त्याचा आज ही पत्ता लागलेला नाही. काही जुन्या कार्यकर्त्यांना त्याची आठवण सुद्धा आहे . त्याबाबत आता काही बोलता येत नाही. एकूणच सातारा जिल्हा परिषदेच्या धुळखात पडलेल्या यंत्रणा, टेबल, खुर्च्या याचा किमान लिलाव तरी करून त्या निधीतून इतर नवीन साहित्य खरेदी करावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते व सातारा शहर उपाध्यक्ष अमोल गंगावणे व भाजप अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष राजू जेधे आणि ग्रामस्थांनी केली आहे.
—————————————————————– फोटो – सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात धुळखात पडून असलेली यंत्रणा (छाया – अजित जगताप, सातारा)