सातारा:-रयत स्वाभिमानी संघटनेतर्फे जिल्हा रुग्णालयात अन्नदान उपक्रम.
सहसंपादक अशितोष चव्हाण :-7378619519

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
रयत स्वाभिमानी संघटनेतर्फे जिल्हा रुग्णालयात अन्नदान उपक्रम.
प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार व मान्यवरांच्या हस्ते सामाजिक बांधिलकीतून उपक्रम.
सातारा / प्रतिनिधी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रयत स्वाभिमानी संघटनेमार्फत येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात नुकतेच अन्नदान उपक्रम राबवण्यात आला. रयत स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. दर महिन्याच्या पहिल्या व चौथ्या शुक्रवारी जिल्हा रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करणार असल्याचे सागरदादा पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच या नियोजित वारांव्यतिरिक्तही अन्य दिवशीही आवश्यकता भासल्यास आपण अन्नदान उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी सागरदादा पवार यांनी सांगितले.
रयत स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशीलभाऊ कदम महिला आघाडीच्या स्वातीताई माने, मोहिनीताई माने,संघटनेचे जिल्हा सचिव अभय जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रवक्ता आयु. संदीपभाऊ जाधव, पैलवान विक्रम साठे, वंदनाताई पवार, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गुंजवटे, युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सपनाताई भोसले,
रयत स्वाभिमानी संघटना जिल्हा सरचिटणीस निहाल इनामदार, जिल्हा संघटक अविनाश दडस, जिल्हा उपाध्यक्ष सुमितभाऊ साळुंखे, संजीवन सामाजिक संस्थेचे मिलिंद कांबळे, योगेश साळुंखे, दीपक कणसे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अन्नदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाबद्दल रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. तसेच रयत स्वाभिमानी संघटनेने सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या उपक्रमाबद्दल आभार मानले.