खटाव:-विना परवाना जनावरे घेऊन जाणाऱ्या दोघांना औंध पोलिसांकडून अटक.
पत्रकार प्रमोद देवाडिगा:-( महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ):-9623714741

पत्रकार प्रमोदACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483 देवाडिगा:-( महाराष्ट्र राज्य अध्यक्ष )
विना परवाना जनावरे घेऊन जाणाऱ्या दोघांना औंध पोलिसांकडून अटक.
पुसेसावळी ( प्रतिनिधी ) :
खटाव तालुक्यातील वडगाव ते चोराडे रस्त्यावरील लिंबारे वस्तीजवळ एक छोटा हत्ती क्र. MH 11 AG -5140 या वाहनाने जनावरे विनापरवाना कत्तलीसाठी घेऊन जातानाची खबर दादासो मारुती माळी (वय 48 )यांनी औंध पोलीस स्टेशनला दिल्यानंतर औंध पोलिसांकडून 15 जुलै 2023 दुपारी 3.00 च्या सुमारास वडगाव चोराडे रस्त्यावरील लिंबारे वस्ती जवळ अनिल मोहन गायकवाड वय -32 वर्षे, रा. तडसर, वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली, व बबन बंडू उमापे, वय -66 वर्षे, रा. रहाटणी, ता. खटाव यांचेकडून एक गोवंशिय पांढऱ्या रंगाचे गाय 20,000/-रु, तर एक काळ्या रंगाचे रेडा 2000/-रु, तसेच छोटा हत्ती वाहन 100,000/- रु अशी एकूण 1,22,000 किंमती च्या मालासह दोन आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पुसेसावळी दूरक्षेत्राचे पोलीस नाईक राहुल सरतापे करीत आहेत.