मेढा:-निवडणुकीच्या धामधुमीत जावळीत यात्रेनिमित्त श्रद्धाळू भाविकांसाठी महाप्रसाद……
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

निवडणुकीच्या धामधुमीत जावळीत यात्रेनिमित्त श्रद्धाळू भाविकांसाठी महाप्रसाद……

मेढा दि: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाचे बारकाईने लक्ष असूनही जेवणावळी कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभत आहे. अशा या गदारोळामध्ये जावळी तालुक्यात श्रद्धेपूर्वक वार्षिक यात्रेनिमित्त महाप्रसाद वाटण्यात आला. यामध्ये फक्त श्रद्धाळू भाविक व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
याबाबत माहिती अशी की, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यामध्ये सध्या दुर्गम भागातील वार्षिक यात्रा सुरू झालेली आहे. त्यामुळे चाकरमानी व गावाच्या बाहेर उपजीविकेसाठी जाणारे अनेक भूमिपुत्र आपल्या गावाला भेट देत आहेत .आपल्या कुलदैवताचे दर्शन घेऊन सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहेत. यामध्ये मोठ्याचीवाडी (गांजे) तालुका जावळी येथील श्री जन्नीमाता देवीच्या वार्षिक उत्सवाला सध्या ग्रामस्थ जमले आहेत. देवीची पालखी पूजाअर्चा तसेच धार्मिक उत्सव आणि भजन, कीर्तन आणि महाप्रसादानिमित्त आयोजन करण्यात आले होते.
मोठ्याचीवाडी (गांजे) या ठिकाणी ३८ घरांचा उंबरठा असला तरी दहा ते बारा घरातील लोक मोठ्याचीवाडी (गांजे) या ठिकाणी वास्तव्यास आहेत. वार्षिक यात्रेनिमित्त गावांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक नव्या जुन्या पिढीतील लोक एकत्र आले आहेत.खऱ्या अर्थाने वाडीत चैतन्य पसरले आहे.
ग्रामस्थ मंडळ मोठ्याचीवाडी (गांजे) व श्री जन्नीमाता सामाजिक व सांस्कृतिक मित्र मंडळ यांच्या वतीने संपूर्ण कार्यक्रम आनंदात साजरा झाला आहे.गेली दहा वर्षापासून वार्षिक यात्रा भरत असून देवीच्या मंदिराचा परिसर नूतनीकरण करण्यात आलेले आहे.
या यात्रेसाठी गांजे गावच्या परिसरातील घरातघर, लिगाडेवाडी, सांगवी, गायमाळ, गांजे गाव तसेच प्राथमिक शाळेची मुले देवीचे दर्शन आणि धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादासाठी सहभागी झाले होते .
व सदरचा यात्रा सोहळा यशस्वी पणाने पार पाडण्यासाठी राजेंद्र चिकणे, उमेश चिकणे, रोहित चिकणे, राजेंद्र देशमुख, शैलेश चिकणे, रमेश देशमुख, अतुल देशमुख यांच्या समवेतच ग्रामस्थ परिश्रम घेतले आहेत. त्यांना माता भगिनींची ही साथ लाभत आहे.
मोठ्याचीवाडी गांजे येथील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच तरुण वर्गाने एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन एक आदर्श निर्माण केला आहे. यात्रेनिमित्त गाठीभेटी व गेट-टुगेदर व्हावे. या हेतूने घेतलेल्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला आहे .मोठ्याच्या वाढीचा एकोपा आणि मानवता भावनेतून एकमेकांना दिलेली माणुसकीची वागणूक ही खऱ्या अर्थाने श्री . जन्नीमाता देवीने दिलेलाच आशीर्वाद आहे. असं मानण्यात येत आहे.




