पुणे -(ओझर):-शिरवळ येथील श्री स्वामी समर्थ संस्थेच्या मुलांनी ओझर येथे १३ वी पामा इंडिया अॅबॅकस आणि मानसिक अंक गणित राष्ट्रीय स्पर्धा यशस्वी रित्या पाडल्या पार.
पत्रकार अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अशितोष चव्हाण
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणी कृत )
शिरवळ:-येथील श्री स्वामी समर्थ संस्थेच्या मुलांनी ओझर येथे १३ वी पामा इंडिया अॅबॅकस आणि मानसिक अंक गणित राष्ट्रीय स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडल्या.
ओझर, पुणे – १२ जानेवारी २०२५ रोजी १३ वी पामा इंडिया अॅबॅकस आणि मानसिक अंक गणित राष्ट्रीय स्पर्धा ओझर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विविध शहरे आणि राज्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.स्पर्धेचे स्वरूप अत्यंत आव्हानात्मक होते, ज्यामध्ये विविध गटांनुसार विद्यार्थ्यांना तीन मिनिटांत १०० किंवा ५० अंकगणित समस्या सोडवायच्या होत्या. या समस्यांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांचा समावेश होता.
सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले. गट ‘क’मधून हर्षित डावरे याने चॅम्पियन पुरस्कार पटकावला, तर गट ‘ब’मधून पृथ्वीराज भरगुडे चॅम्पियन ठरला. गट ‘अ’, ‘’ गट ‘ब’ आणि गट डी मधून अनुक्रमे श्रवण चव्हाण, अनुश्री नेवसे, आणि सना शेख हे प्रथम क्रमांकावर राहिले. द्वितीय उपविजेतेपदासाठी शिवप्रसाद बेलुरे, निष्ठा बेलुरे, कार्तिकी सुर्वे, शंभूराज टिळेकर, अर्णव नेवसे, शौर्य वाडकर आणि रिद्धीस भरगुडे यांनी यश संपादन केले.
याशिवाय, अवघ्या 4.5 वर्षांचा शिवांक शेटे याने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला. सान्वी भोसले, स्वरा नेवसे, आयात खान, किरण बडाकुरी, श्रावणी शिंदे, स्वरा विरकर, स्नेहल बडकुंबे, इकरा शेख, अनुश्री चव्हाण, शार्दुल रणनवरे, विनया घाडगे आणि अद्विक राऊत यांसह अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीने त्रितीय उपविजेतेपद मिळवले.
ही स्पर्धा PAMA इंडिया यांनी आयोजित केली होती. अक्षरशिल्प पिमास प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. आबाजी दत्तू काळे आणि श्रीमती शिल्पा आबाजी काळे यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅबॅकस शिक्षणाचे महत्त्व आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी महत्त्वपूर्ण विचार मांडले.
प्रतिभा बेलुरे यांनी विशेष विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कठोर परिश्रमांमुळे त्यांचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या समर्पणामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन करताना आयोजकांनी या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांना नवा आयाम मिळाल्याचे सांगितले.