खटाव:-धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यां एका व्यक्तीवर गुन्हा दाखल.
पत्रकार नितीन कुलकर्णी:-9307293406

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नितीन कुलकर्णी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यां एका व्यक्तीवर गुन्हा दाखल.
वडुज –
दिनांक 5 जुलै रोजी खटाव तालुक्यातील काही शिवभक्तांना फेसबुक या समाजमाध्यमावर tipu sultan या नावाचे फेसबुक खाते दिसून आले. या खात्यास mutual friend असणाऱ्यांकडून चौकशी केली असता या खात्यावर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या सुप्रसिद्ध सिंहाचा जबडा फाडतानाच्या चित्रावर क्रूरकर्मा टिप्या सुलतानचा चेहरा लावून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची विटंबना करण्यात आली होती. या फेसबुक खातेधारकाची सखोल माहिती घेतली असता सदर इसम कलेढोण येथील असून त्याचे नाव आयाज अमीन शिलकलगार असे आहे. सदर प्रकरणामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या असून गेल्या तीन महिन्यांत झालेला हा चौथा प्रकार आहे. ह्या आधी पोलीस प्रशासनास वेळोवेळी घटनांचे गांभीर्य लक्षात देऊन देखील प्रशासनाकडून डोळेझाक करण्यात आली. याचं गोष्टीचा फायदा घेऊन समाज कंटक वारंवार अश्या कृती करत आहेत. याला वेळीच आळा घातला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. सदर कृत्याचा विरोध करण्यासाठी पोलिस ठाण्यात हिंदु धर्मीय गेले असता, पोलीस निरीक्षक कोकाटे साहेबांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित सूत्रे हाती घेतली. हिंदु बांधवांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची खात्री देऊन सदर इसमाला चौकशीस बोलवण्यात आले. त्याच वेळी समस्त हिंदू बांधवानीं गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता,याची दखल घेत डिवाय एस पी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कोकाटे साहेब यांनी त्या इसमावर धार्मिक भावना दुखावल्या या कृत्यासाठी 295A हे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजातील शांतता व सदभावना कायम ठेवण्यासाठी दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे असे मत समाजातून व्यक्त होत आहे. अश्याप्रकारे सामाजिक सलोखा बाधित करणाऱ्यांवर यापुढे देखील कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक अजय कोकाटे यांच्याकडून देण्यात आले.