आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिंधुदुर्ग:-कुडाळमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कुडाळमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन.
कुडाळ : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबवले जात आहे. या अभियानांतर्गत, कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथे विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये मधुमेह, रक्तदाब, कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांची तपासणी, तसेच नेत्र आणि दंत तपासणी केली जाईल. जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळः २३ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत तर ग्रामीण रुग्णालय, कुडाळ येथे २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होणार आहे.




