आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव :-हिंदू बांधवांसाठी वडूज मध्ये मुस्लिम समाजाने रद्द केली बकऱ्याची कुर्बानी.

पत्रकार अजित  जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अजित  जगताप सातारा

हिंदू बांधवांसाठी वडूज मध्ये मुस्लिम समाजाने रद्द केली बकऱ्याची कुर्बानी.

वडूज दि:
महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री. विठ्ठल रखुमाई यांची वारी आषाढी एकादशीच्या दिवशी येत आहे. दोन्ही समाजाच्या लोकांसाठी दोन्ही सण पवित्र आहे. त्यामुळे मुस्लिम समाज कब्रस्तान आणि ईदगाह ट्रस्ट च्या वतीने आषाढी एकादशी तथा बकरी ईद दिवशी कोणत्याही प्रकारची कुर्बानी न करण्याचा सामुदायिक निर्णय घेतला आहे. त्याचे मान्यवरांनी स्वागत केले आहे .
सध्या देशभर सांप्रदायिक वातावरण जोमात चालले असतानाच खटाव तालुक्यातील हिंदू- मुस्लिम बांधवांनी पुन्हा एकदा एकोपा तसेच सर्वधर्मसमभा वाचे शिकवण कायम जतन करण्यासाठी प्रयत्न केला आहे. आम्ही सारे भारतीय आहोत. या प्रतिज्ञाशी निगडित आहे. आज सकाळी खटावचे तहसीलदार प्रशांत जाधव व पोलीस उपअधीक्षक अमर कोकाटे यांची भेट घेऊन बकरी ईद दिवशी बकऱ्याची कुर्बानी गुरुवारी न करणे त्याऐवजी शुक्र वारी करण्यात येणार आहे.बाबतचा निर्णय निवेदनाद्वारे कळविण्यात आला.
हिंदू बांधवांच्या भावना दुखावण्याचे काम कोणीही करणार नाही तसेच बकरी ईद व आषाढी एकादशी भक्ती भवानी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. खरं म्हणजे नमाज पठण करून दिवसभरात बोकडाची कुर्बानी दिली जाते परंतु आषाढी एकादशीनिमित्त एक दिवसाचे जीवदान म्हणजे खऱ्या अर्थाने मानवतावादी दृष्टीकोन या निमित्त पाहण्यास मिळालेले आहेत. वडूज येथील मुस्लिम समाजाचे इम्रान सिकंदर बागवान, सिराज शिकलगार ,दाऊद खान, रशिद शेख, मोहम्मद मुल्ला, इसाक मुल्ला, बरकत मुल्ला, मन्सूर पिंजारी, महमंद शिकलगार, याकूब बागवान आदि मुस्लिम समाजाचे मान्यवर उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून जातीय सलोखा कायम राखला जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

————————————————-
फोटो – खटाव तहसिलदार प्रशांत जाधव व पोलीस उप अधीक्षक अमर कोकाटे यांना निवेदन देताना मुस्लिम बांधव (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button