पाटण :-पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच खा. राऊत यांनी ‘ मंत्री देसाईंचा फेकनेता असा केला उल्लेख.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच खा. राऊत यांनी ‘ मंत्री देसाईंचा फेकनेता असा केला उल्लेख.
मल्हार पेठ दि: शिवसेनेचे आमदार व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मल्हार पेठ ता.पाटण येथील जाहीर सभेत पावसात जोरदार बॅटिंग करून पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा उल्लेख फेक नेता असे केला. यावेळी खोक्याचा हिशोब व्याजासह परत करू असाही गर्भित इशारा देण्यात आला.
मल्हार पेठ ता .पाटण येथील विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त खा .संजय राऊत बोलत होते. या वेळेला शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे- पाटील, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल कदम, सरपंच धनश्री कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री शंभूराजे यांच्या पोस्टर कडे पाहून दात काढत असलेल्या लोकांनी आम्हाला कधी बोलावलं नाही. खरं म्हणजे बाळासाहेब देसाई हे लोकनेते म्हणून ओळखतात. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा घरोब्याचे संबंध होते .
शिवसेनेच्या स्थापनेपासून आदरणीय बाळासाहेब देसाई खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले. मराठी माणसांची संघटना व अस्मिता टिकवण्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यातील पाटण मधील कष्टकरी माणसाला शिवसेना टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले.आज आम्ही पाहतो पाटण हा भूकंपाचा केंद्रबिंदू असतो. तसा तो खोक्याचाही केंद्रबिंदू आहे. पाटणकरांनी अनेक धक्के सहन करून पुन्हा उभे राहिलेले आहेत .आताच्या धक्क्या पेक्षा भाऊचा धक्का चांगला असे स्पष्ट करून खासदार राऊत म्हणाले, एक्सायिजचे खोके घेणाऱ्यांची आम्ही २०२४ ची वाट पाहत आहे. सर्व हिशोब पूर्ण केला जाईल. पाटणची स्वाभिमानी जनता आहे. तुळशीमध्ये भांगाचे रोप आले ते काढून टाकले जाणार आहे. पाटण तालुक्यामध्ये विक्रमसिंह पाटणकर यांनी नेतृत्व केले. अत्यंत सुसंस्कृत व संयमी नेतृत्व होते. यापुढे महाविकास आघाडीच्या पाटणचा आमदार होईल. कारण नवसाला देव पावला नाही देव बदलणारे अवलाद आहे .लोकांना काम करून देत नाहीत. लोकांना वाळीत टाकले जाते. मला तर जेलमध्ये टाकले. आपण घाबरायचं नाही. २०२४ साली सत्ता येईल. तेव्हा हे कोणत्या तरी बिळात बसतील व शिवसेना पक्षाच्या दारात उभे असतील असे खासदार संजय राऊत यांनी शंभरात देसाई यांचा नाम उल्लेख टाळून आपले मत व्यक्त केले.
दरम्यान ,मल्हार पेठ झालेले सभेमध्ये परिवर्तनाचे लाट दिसून आली भर पावसातही अनेक लोक खासदार संजय राऊत यांचे भाषण ऐकण्यासाठी भिजत होते. या वेळेला ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांची सातारा जिल्हा परिषदेतील पावसाच्या सभेची आठवण झाली. त्यावेळी सुद्धा जाहीर सभेत पवार साहेब भिजले आणि साताऱ्यात क्रांती घडली .तशाच पद्धतीने आजच्या पावसामुळे पाटण तालुक्यातील अशीच क्रांती घडेल.असा सार्थ विश्वास शिवसेनेचे जावलीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख हनुमंतराव चवरे -पाटील यांनी व्यक्त केले आहे . मोठ्या संख्येने पाटण तालुक्यातील शिवसैनिक सभेला उपस्थित राहिले होते. सभेपूर्वी शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी खा . राऊत यांची भेट घेऊन चर्चा केली . यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख हणमंत चवरे -पाटील , प्रा . नितीन बानुगडे- पाटील हे सुद्धा उपस्थित होते. _____________________________________. मल्हार पेठ ता. पाटण येथे झालेल्या सभेत पावसात भिजून मार्गदर्शन करताना खा. संजय राऊत (छाया _अजित जगताप, सातारा)