वाई शहरात दुचाकी जाळणारे आणि चार चाकी वाहनांची तोडफोड करणारे चौघे जेरबंद-वाई पोलिसांची दमदार कामगिरी.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण;-8208717483.
वाई शहरात दुचाकी जाळणारे आणि चार चाकी वाहनांची तोडफोड करणारे चौघे जेरबंद-वाई पोलिसांची दमदार कामगिरी.
पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन चिडून जावून चौघांनी दि. 15 रोजी रात्री पावणे एक ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी जाळली होती आणि 12 चार चाकी वाहनांची तोडफोड वाई शहरात केली होती. त्या चौघांचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेवून त्यांना जेरबंद केले. विजय मछिंद्र धोत्रे (वय 21 वर्षे, रा सिध्दनाथ वाडी वाई, समीर ख्वाजा पठाण (वय 19 वर्षे रा सिध्दनाथ वाडी वाई) यांच्यासह दोन अल्पवयीन मुले असून त्यांनी पोलिसांकडे गुह्याची कबुली दिली आहे. पोलीस त्यांच्याकडून शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि. 15 रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी वाई शहरातील रामडोह आळी, ब्राम्हणशाही आणि गंगापूरी येथे 12 चार चाकी वाहनांची तोडफोड व एका दुचाकीची जाळफोड केली होती. त्याची वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या प्रकारामुळे वाई शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना या घटनेतील आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. त्यावर वाई पोलीस आणि डीबी पथक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत होते. तसेच गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळवत होते. दि. 18 रोजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना एका आरोपीची माहिती मिळताच त्यांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून इतर तीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. त्या तिघांना पाचवड, सातारा येथून ताब्यात घेतले. त्यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडे विचारपूस केली असता पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन हा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले. ही कारवाई वाईचे डीबी पथकाचे विजय शिर्के, सोनाली माने, किरण निंबाळकर। श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, अमित गोळे यांनी केली.