कोपरगाव:-कोपरगांवकरांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार – आमदार आशुतोष काळे
संपादक अरुण आहेर:-(आग न्यूज नेटवर्क)9096664533

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
- संपादक अरुण आहेर आग न्यूज नेटवर्क
कोपरगांवकरांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार – आमदार आशुतोष काळे
🔥 आग न्यूज नेटवर्क कोपरगाव- शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १३१.२४ कोटी रुपये निधीतून सुरू असलेल्या साठवण तलाव क्र. ५ व वितरिकांच्या कामाअंतर्गत साठवण तलाव क्र. ५ च्या काँक्रीटीकरण करणे कामाचा शुभारंभ आज आमदार .श्री. आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका .सौ. चैताली काळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, मनसेच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून तसेच विविध संघटनांकडून आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, अजित लोहाडे, सुधीर डागा, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, राजेश ठोळे, सौ. सुधाभाभी ठोळे, तुलसिदासजी खुबानी, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष विजय बंब, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, एजसीचे प्रमुख राजेंद्र सनेर, अरविंद भनसाळी, संजय भनसाळी, मनीष फुलपगर, सुरेंद्र ठोळे, कांती पटेल, आशुतोष पटवर्धन, योगाचार्य उत्तम शहा डॉ. विलास आचारी, अजय गर्जे, डॉ. तुषार गलांडे, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बंब, दीपक विसपुते, सतीश कृष्णाणी, मंदार आढाव, सलीम पठाण, संदीप रोहमारे, सुनील फंड, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरम बागरेचा, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना माजी शहराध्यक्ष भरत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व माजी जिल्हा परिषद -पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे आजी माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, आजी माजी संचालक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.