मावळ:-संविधान दिनाचे औचित्य साधून जि.प.प्राथमिक शाळा कोटमवाडी येथे ३५ विद्यार्थ्यांंना स्कूल कीट चे वाटप.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
संविधान दिनाचे औचित्य साधून जि.प.प्राथमिक शाळा कोटमवाडी येथे ३५ विद्यार्थ्यांंना स्कूल कीट चे वाटप.
आज शनिवार दि. २६ रोजी मावळ तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या कोटमवाडी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकूण ३५ विद्यार्थ्यांंना खुशी के रंग फाऊंडेशन कडून आणि अक्षर भारती या संस्थेच्या प्रयत्नाने संविधान दिनाचे औचित्य साधून ३५ विद्यार्थ्यांंना मोफत स्कूल कीटचे वाटप करण्यात आले. या कीट मध्ये स्कूल बॅग, ४ वह्या, चित्रकला वही, स्केच पेन, रंगीत खडू, कंपास पेटी, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पाण्याची बाटली इत्यादी साहित्यांचा समावेश आहे.
संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानाने दिलेल्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकार असलेल्या परंतु मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या जिल्हा परिषद शाळा कोटमवाडी मावळ येथे आदिवासी कातकरी, आणि धनगर समाजाचे एकूण ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु दळणवळणाची मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने, आणि शिक्षणविषयक जनजागृती नसल्याने मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते. परंतु या मुलांना अशा विविध संस्थानी वेळोवेवेळी मदतीचा हात दिल्यास या मुलांमध्ये देखील शिक्षणाची गोडी निर्माण होईल, असे मत शाळेचे मुख्याध्यापक राजनकुमार पवार यांनी व्यक्त केले. खुशी के रंग फाऊंडेशन मार्फत राज्यभर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अशाप्रकारची मदत करण्याचे काम गेली अनेक वर्षे अविरतपणे सुरू आहे. आम्हाला भविष्यात अनेक ए. पी. जे. अब्दुल कलाम घडवायचे आहेत. आणि म्हणुनच त्यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन हा उपक्रम हाती घेतल्याचे खुशी के रंग फाऊंडेशनचे निलेश शिंगे यांनी यांनी सांगितले. आदिवासी मुलांच्या चेहर्यावरील आनंद पाहून सर्वजण योग्य ठिकाणी मदत झाल्याची भावना व्यक्त करत असल्याचे दिसले. यावेळी निलेश शिंगे, डॉ. अश्विनी, डॉ.स्वाती कांबळे, धर्मेंद्र ठाकर, आणि मुख्याध्यापक राजनकुमार पवार आणि सहशिक्षक नवनाथ सुर्वे आदि उपस्थित होते.