वाई:-जागतिक विद्यापीठ आर्चरी स्पर्धा निवड चाचणीसाठी किसन वीर महाविद्यालयाचे खेळाडू शिवाजी विद्यापीठाच्या वतीने पात्र.
पत्रकार वैष्णवी शिंदे:-9146802009

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे
वाई दि.5 जागतिक विद्यापीठ आर्चरी स्पर्धा निवड चाचणीसाठी किसन वीर महाविद्यालयाचे खेळाडू शिवाजी विद्यापीठाच्या वतीने पात्र.
दि. १४ व दि. १५ जून २०२३ रोजी कलिंगा विद्यापीठ, भुवनेश्वर ओरिसा येथे होणाऱ्या जागतिक विद्यापीठ आर्चरी स्पर्धा निवड चाचणीसाठी महाविद्यालयातील हर्ष बोराटे व मयुर रोकडे या दोघांची निवड शिवाजी विद्यापीठाच्या वतीने झाली आहे. त्यांच्यासोबत विद्यापीठाच्या वतीने मार्गदर्शक म्हणून कॅप्टन समीर पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापैकी हर्ष बोराटे याने नुकत्याच उझेबकिस्तान येथे पार पडलेल्या एशिया कप स्टेज २ (कंपांऊंड) मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करून उत्कृष्ठ कामगिरी केली.
या गुणवान खेळाडूंना जागतिक विद्यापीठ आर्चरी निवड चाचणीसाठी संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायण चौधरी, सर्व संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य आणि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.