लोहगाव( वार्ताहर)
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालयाचा एस.एस.सी परीक्षा मार्च 2023 निकाल 96.30% लागला आहे. विद्यालयात पठाडे पवन दादासाहेब 91.80% गुण मिळवून प्रथम , दळे समर्थ सुभाष 90.40% गुण मिळवून द्वितीय व आहेर सुयोग दिलीप 87.80% गुण मिळवून तृतीय आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व जनरल बॉडी सदस्य श्री.रावसाहेब नाथाजी म्हस्के पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.अरूण कडू पाटील, जनरल बॉडी सदस्य श्री.एकनाथ चंद्रभान घोगरे पाटील, जनरल बॉडी सदस्य श्री.बी.जी.आंधळे सर , प्राचार्य शेळके एन.बी. , पर्यवेक्षक श्री.वडितके डी.के., उपप्राचार्य श्रीम.आहेर ए.आर., शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक आदींनी अभिनंदन केले आहे.