कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

नाशिक:-येवलेकरांसाठी सुवर्णक्षण… मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी अखेर येवल्यातील डोंगरगावात…..!!!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS

येवलेकरांसाठी सुवर्णक्षण… मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी अखेर येवल्यातील डोंगरगावात…..!!!

मांजरपाडा प्रकल्पातील पाणी दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यातून अखेर आपल्या येवला तालुक्यातील डोंगरगाव साठवण तलावात प्रवाहित झाले आहे. अर्थातच माजरपाड्याचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचलंय! हा आपल्या अथक प्रयत्नांच्या पुर्णत्वाचा, स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. येवला मतदारसंघातील समस्त जनतेच्या आणि माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण आहे.

आपल्या प्रयत्नांतून साकार झालेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी येवला तालुक्यातील डोंगरगावपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणेगाव – दरसवाडी – डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरणाचे काम अतिशय युद्धपातळीवर सुरू होते. ९४७.४० कोटी रुपये खर्चातून झालेल्या या मांजरपाडा आणि पूनेगाव दरसवाडी प्रकल्पाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असल्याने अतिशय विक्रमी वेळेत मांजरपाडा धरणातून पुणेगांव व दरसवाडीतून येवला तालुक्यात डोंगरगावच्या दिशेने पाणी प्रवाहित झाले आहे. या पाण्यामुळे येवला तालुक्यातील तीन पिढ्यांचे स्वप्न साकार होत आहे. येवल्याच्या भाग्योदयाचा हा क्षण आहे!

हा सुवर्णक्षण आपण नक्कीच साजरा करणार आहोत. उद्या, शनिवार दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता डोंगरगाव साठवण तलाव येथे जलपूजन समारंभ होणार आहे.

या जलपूजन सोहळ्यास उपस्थित राहून या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातील समस्त शेतकरी बंधू-भगिनींनी बहुसंख्येने नक्की उपस्थित रहावे हि नम्र विनंती…..!!!

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button