सातारा:-आम्ही जातो प्रा.शिक्षक म्हणूनही आमच्या गावा, राम राम घ्यावा…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
आम्ही जातो प्रा.शिक्षक म्हणूनही आमच्या गावा, राम राम घ्यावा…
सातारा दि: प्राथमिक शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र काम करत असताना अनेकांना आपल्या मायभूमीतून कर्मभूमीत जावे लागले. आखिर तब्बल १८ वर्षानंतर सातारा जिल्ह्यातून आपापल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाल्यामुळे अनेक शिक्षकांना आनंद अश्रू आवरता आले नाहीत. आम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून जातो आमच्या गावा,,, आमचा राम राम घ्यावा,, ही भावनिक साद प्राथमिक शिक्षकांनी घातली .
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर चार महिन्यापूर्वी विराजमान झालेल्या श्रीमती यशानी नागराजन यांनी व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ८४ प्राथमिक शिक्षकांना अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड अशा जिल्ह्यात तब्बल १५ ते १८ वर्षांनी प्राथमिक शिक्षक म्हणून जाण्याची संधी मिळाली आहे. यापैकी काही शिक्षकांनी सातारा जिल्ह्यात स्वतःची आर्थिक गुंतवणूक व घर घेतले होते. आता त्यांना हे सर्व सोडून आपापल्या जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्याने प्राथमिक शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करावे लागणार आहे.
सातारा जिल्ह्यातील मातीने आम्हाला भरपूर दिलेला आहे. तसेच संस्कारही मिळालेले आहेत. त्यामुळे आयुष्यात सातारा जिल्ह्याबद्दल नेहमीच आदर असणार आहे. या कौटुंबिक सोहळ्यामध्ये आय.ए.एस. अधिकारी श्रीमती नागराजन यांच्या मनाच्या मोठेपणाची ही दर्शन घडले. बदली झालेले प्राथमिक शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांची भेट घेऊन त्यांनी नियुक्तीचे आदेश दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. त्या वेळेला शिक्षक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचे योजले होते. पण मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी या सत्काराचे श्रेय हे सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर यांचे असल्यामुळे त्यांचा सत्कार करा. अशी सूचना केली. तसेच स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी े शिक्षणाधिकार्याची वाट पाहत होते. या घटनेमुळे उपस्थित प्राथमिक शिक्षकांना सुद्धा गहिवरून आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे प्राथमिक शिक्षण संघाचे पदाधिकारी महेंद्र जानुगडे व इतर शिक्षकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांचा सत्कार केला. प्रसंगाने सातारा जिल्हा परिषदेतील चौथा मजला हा भावनिक नात्याने गजबजून गेला होता………………..
फोटो सातारा जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन व शिक्षणाधिकारी श्रीमती मुजावर आणि अधिकारी यांचा सत्कार करताना शिक्षक वर्ग (छाया- अजित जगताप, सातारा)