ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील 4368 रिक्त शासकीय पदे केव्हा भरणार – दिपक खैरनार.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील 4368 रिक्त
शासकीय पदे केव्हा भरणार – दिपक खैरनार
पिपंरी, दि.१२ (शफिक शेख):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध शासकीय विभागातील तब्बल ४ हजार ३६८ पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. हि माहिती प्रशासन विभागाने उपलब्ध करून दिली आहे. ही रिक्त पदे केव्हा भरली जाईल आणि त्या न भरलेल्या पदांमुळे होणा-या त्रासापासून पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना केव्हा मुक्ती मिळणार असा प्रश्न दिपक खैरनार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला विचारला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला. त्यामुळे अनेक नवीन पदे निर्माण झाली आहेत. तसेच दर महिन्यास किमान ५० ते १०० अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर तसेच स्वेच्छा निवृत्ती घेऊन निवृत्त होत आहेत. महापालिका हद्दीतील लोकवस्ती वेगाने वाढत असल्याने लोकसंख्या वाढून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. तब्बल ४ हजार ३६८ इतकी पदे व नव्याने निर्माण झालेली पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारामुळे उघड झाले आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाद्वारे कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेकांना अतिरिक्त पदभार सोपवून कामे करून घेतली जात आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी महापालिकेचे विविध विभागातील ‘अ, ब, क आणि ड’ या श्रेणीत एकूण ३५६ संवर्ग आहेत. यात मंजूर पदांची संख्या ११,५१३ इतकी आहे. त्यापैकी ७,१२४ इतकी पदे भरली आहेत. तर ४ हजार ३६८ इतकी पदे रिक्त आहेत. ‘अ’ श्रेणीत एकूण १२१ संवर्ग आहेत तर त्यात २८१ पदे मंजूर असून त्यापैकी १६५ पदे भरलेली असून ११६ पदे रिक्त आहेत. ‘ब’ श्रेणीत एकूण ४७ संवर्ग आहेत तर त्यात ३२४ पदे मंजूर असून त्यापैकी २०७ पदे भरलेली असून ११७ पदे रिक्त आहेत. ‘क’ श्रेणीत एकूण १५४ संवर्ग आहेत तर त्यात ५३५० पदे मंजूर असून त्यापैकी ३३९७ पदे भरलेली असून १९५३ पदे रिक्त आहेत. ‘ ड-इतर’ श्रेणीत एकूण २७ संवर्ग आहेत तर त्यात २९६५ पदे मंजूर असून त्यापैकी १७२४ पदे भरलेली असून १२४१ पदे रिक्त आहेत. ‘ ड-सफाई संवर्ग’ श्रेणीत एकूण ०७ संवर्ग आहेत तर त्यात २५९३ पदे मंजूर असून त्यापैकी १६५२ पदे भरलेली असून ९४१ पदे रिक्त आहेत.
रिक्त पदांमुळे सेवेत दिरंगाई व नागरिकांना नाहक त्रास
पिंपरी पालिकेतील एकूण पदे आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाची पडताळणी केल्यास रिक्त पदे अधिक आहेत. रिक्त पदांमुळे सेवेत दिरंगाई होते यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने हि रिक्त पदे तात्काळ भरण्याची आवश्यकता आहे, असेही श्री. खैरनार यांनी सांगितले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button