वाई:-सामुदायिक गाथा पारायण सोहळ्यासाठी वाई नगरी सज्ज.
पत्रकार वैष्णवी शिंदे:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION-राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे
दि. 21 वाई
सामुदायिक गाथा पारायण सोहळ्यासाठी वाई नगरी सज्ज.
दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या वाईनगरीत द्रविड हायस्कूल येथे भव्य दिव्य असा गाथा पारायण सोहळा दि.20 पासुन संपन्न होत आहे. गाथा पारायणासाठी गेले कित्येक दिवस जिल्ह्यातील गाथा पारायण समिती तालुक्यातील वारकरी यांची जोरदार तयारी चालू होती या दिवसाची कित्येक जण खूप आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या सोहळ्याचीच म्हणजे गाथा पारायणाची सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी वाई तालुक्यातील माऊली युवा वारकरी ग्रुप मधील युवकांनी मोठ्या उत्सुकतेने सहभागी होऊन युवा पिढीसाठी योग्य वाटचालीने चालत असल्याचा संदेश यातून दिलेला आहे. या पारायणासाठी महाराष्ट्रातील मोठ-मोठे कीर्तनकार यांची सेवा सुरू करण्यात आली आहे. या गाथा पारायणामध्ये हजारो वारकरी वाचक मंडळी महिला पुरुष हे या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. पारायणाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सकाळी पांडुरंगाच्या काकड आरती पासून करण्यात आली. त्यानंतर गाथा पारायण व दुपारचे जेवण दुपारच्या जेवणानंतर श्री भागवत कथा व सायंकाळी सामुदायिक हरिपाठ आणि कीर्तन सेवा व त्यानंतर महाप्रसाद असे नियोजन करण्यात आले आहे. इथून पुढचे सातही दिवस असे नियोजन चालू असणार आहे या सोहळ्यासाठी बाहेर गावावरून आलेल्या वारकरी मंडळींसाठी मोफत राहण्याची सोय व सकाळचा नाष्टा दुपारचे जेवण व संध्याकाळचे जेवण याची देखील सोय करण्यात आली आहे
या सात दिवस चालणाऱ्या सोहळ्यामध्ये पहिल्या दिवसाचे कीर्तन सेवा ह भ प संजय महाराज धोंडगे नाशिक यांची झाली त्यानंतर इथून पुढे दुसऱ्या दिवसाची किर्तन सेवा ह भ प केशव महाराज मुळीक तिसऱ्या दिवसाची सेवा ह भ प ज्ञानेश्वर महाराज कदम चौथ्या दिवसाची सेवा ह भ प पांडुरंग महाराज घुले पाचव्या दिवसाची सेवा ह भ प कानोबा महाराज देहूकर सहाव्या दिवसाची सेवा ह भ प अनिल महाराज पाटील सातव्या दिवसाची सेवा ह भ प उमेश महाराज दशरथे व अखेर ह भ प गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर यांची काल्याची कीर्तन सेवा होणार आहे. हा सोहळा पूर्णतः व्यसनमुक्त असा सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्व भाविक वारकरी यांनी या सोहळ्यासाठी उपस्थित रहावे. कसे आवाहन व्यसनमुक्त युवक संघ व गाथा पारायण समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.