पुणे:-चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राहुल कलाटेंसह 26 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राहुल कलाटेंसह
26 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त.
चिंचवड, दि. 05 (शफिक शेख) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये एकूण वैध मतांच्या मतांपैकी एक षष्टांश (१/६) पेक्षा कमी मते मिळाल्यामुळे २६ उमेदवारांची प्रवर्ग निहाय जमा करण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी निर्गमित केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक २०२३ कार्यक्रम दि. १८ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीमध्ये एकूण २८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. दि. २६ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान झाले, तर दि. २ मार्च रोजी या पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ कलम १५८ नुसार जर एखादा उमेदवार त्या मतदार संघातील एकूण उमेदवारांना मिळालेल्या वैध मतांपैकी १/६ इतकी मते मिळवू शकला नाही (NOTA वगळून) तर उमेदवाराने जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते.
उमेदवारांना या पोटनिवडणूकीतील एकूण वैध मतांच्या मतांपैकी एक षष्टांश (१/६) पेक्षा कमी मते मिळाल्यामुळे अशा प्रवर्ग निहाय उमेदवारांची जमा करण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. अनामत रक्कम जप्त करण्यात आलेले उमेदवारांमध्ये राहुल कलाटे, सुभाष बोधे, गोपाळ तंतरपाळे, सिद्दिक शेख, प्रफुल्ला मोतलिंग, बालाजी जगताप, किशोर काशीकर, श्रीधर साळवे, दादाराव कांबळे, डाॅ.मिलिंदराजे भोसले, अमोल(देविका) सुर्यवंशी, रफिक कुरेशी, मनोज खंडागळे, तुषार लोंढे, राजू काळे, हरिष मोरे, अॅड.सतिश कांबीये, जावेद शेख, सुधीर जगताप, अजय लोंढे, मिलिंद कांबळे, मोहन म्हस्के, सोयलशहा शेख, सतिष सोनावणे, चंद्रकांत मोटे आणि अनिल सोनवणे यांचा समावेश आहे.