ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा जिल्ह्यातून लोकसभेसाठी पुसेसावळीच्या सीमा पोतदार रिंगणात ?

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

सातारा जिल्ह्यातून लोकसभेसाठी पुसेसावळीच्या सीमा पोतदार रिंगणात ?

सातारा दि: महिला सबलीकरण व नारी शक्ती अशा गोंडस नावाने महिला वर्गाला सक्षमीकरण करण्याची मोहीम आखली जात आहे. त्याचे स्वागत आहे. पण लोकसभा निवडणुकीत कर्तबगार महिलांना संधी देऊन त्यांच्या बुद्धीमतेचा वापर देशाचे कायदा व सुव्यवस्था राखण्यात होऊ शकतो. पण, आजही पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिलांना संधी मिळत नाही. ही संधी मिळवण्यासाठी खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील सौ सीमा पोतदार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे .त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. या ठिकाणी सर्वसामान्य महिलांना संधी मिळावी. त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग हा सातारच्या विकासासाठी व्हावा. यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती केली होती. दुर्दैवाने सामान्य महिलांची व्याख्या पूर्णपणे बदलून गेलेले आहे. घराणेशाही चा उगम करण्यामध्ये ज्या नेत्यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. आज अशा नेत्यांची राजकीय अवस्था बिकट झालेले आहे. आजही घराणेशाही पुरस्कृत नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्याला छेद देण्याचे काम ग्रामीण भागातून सीमा पोतदार यांच्यासारख्या महिलेंकडून होत आहे. ही अभिमानाची बाब आहे.
वास्तविक पाहता सर्वसामान्य माणसांना भेडसावणारी महागाई, महिलांना चूल आणि मुल या पलीकडे दृष्टिकोन नाही. असा काहीचा समज आहे. एवढेच नव्हे तर काही महिलांना काही कारणांमुळे लग्नानंतर नांदवले जात नाहीत. त्यांना घटस्फोट दिला जातो. त्यांना आयुष्यभर एकाकी जीवन जगावे लागते. अशा महिलांसाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द पोतदार यांची असल्याने त्यांनी सातारा किंवा माढा लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या सीमा पोतदार यांचे माहेर माण तालुक्यातील मार्डी हे आहे तर खटाव तालुक्यातील पुसेसावळी हे सासर आहे. यापूर्वी पुसेसावळी नगरीचे सरपंच म्हणूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सक्षमरित्या काम केलेले आहे. त्यांना सार्वजनिक जीवनाचा अनुभव आहे. त्यामुळे समाजातील वाढती बेरोजगारी कमी करणे, गुंडशाहीला कायद्याच्या चौकटीतच बंदिस्त करणे, वाढत्या महागाईमुळे अनेकांना जीवन बदलून गेलेले आहे. त्यांना महागाई कमी करून दिलासा दिला तर खऱ्या अर्थाने गोरगरीब हे दोन वेळचे पोटभर जेवण करू शकतात. युवा पिढी व्यसनेच्या आहारी गेलेले आहेत. त्यांच्यामुळे कुटुंब उध्वस्त होत आहेत. त्यांना सावरण्याचे काम करावे लागणार आहे. यासाठी आपण झटणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
धनगर व मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटावा त्यातून सर्वांना संधी मिळावी यासाठीही संसदेमध्ये आवाज उठवणार आहे. असे ही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातून आलेल्या या महिलेच्या खूप आशा आकांक्षा आहेत .परंतु प्रस्थापित वर्ग त्यांना स्वीकारणार का ? हाच खरा प्रश्न आहे .
सातारा जिल्हा हा नायगाव (खंडाळा) गावच्या शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांचा जिल्हा आहे . धावडशी येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई, पहिली महिला कर्नल धनश्री सावंत जगताप लिंक ट्रेन चालक सुरेखा यादव मेट्रो चालक अपूर्व अलटकर , धावपटू ललिता बाबर जनाबाई हिरवे खासदार प्रमिला काकी चव्हाण सामाजिक कार्यात ॲड.वर्षा देशपांडे, चेतना सिन्हा, गायन क्षेत्रात यमुना वाईकर, रोशन सातारकर साहित्य क्षेत्रात बेबी कांबळे डॉ शालिनीताई पाटील अशा अनेक महिलांनी कर्तबगारी दाखवून सार्वजनिक जीवनात आपला ठसा उमटवलेला आहे. आजही त्यांच्या कार्याची ओळख समाज विसरलेला नाही. अशावेळी सौ सीमा पोतदार यांना संधी देण्यासाठी राजकीय पक्षाने पुढे आले तर खऱ्या अर्थाने सव्वा नऊ लाख महिला मतदारांचा गौरव ठरेल .अशा शब्दात अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेले आहेत.
———————————————-
चौकट—- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील कदम यांच्याच पुसेसावळी गावच्या माझी महिला सरपंच सीमा पोतदार यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची जिद्द ठेवले आहे त्यामुळे चर्चेला चांगलेच उधाण आलेले आहे.

फोटो -सीमा पोतदार

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button