खटाव:-नडवळ येथे गळफास घेऊन एका तरुणाची आत्महत्या.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
नडवळ येथे गळफास घेऊन एका तरुणाची आत्महत्या.
वडूज दि: नडवळ ता. खटाव जिल्हा सातारा येथील तरुण महेश दिनकर झेंडे वय ३५ राहणार नडवळ याने स्वतःच्या राहत्या घरी अँगलला दोरी लावून गळफास घेऊन त्याने दुपारच्या वेळेला आत्महत्या केली.
सदर घटनेची माहिती युवराज भिकू झेंडे यांनी पोलिसांना दिली. याबाबत वडूज पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार ए .एस. कदम करत आहेत. सदर घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ माजली असून महेश झेंडे यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली ?याबाबत परिसरात उलट सुलट चर्चा सुरू होती. महेश हा विवाहित होता. लाकूड कापणे, शेत मजुरी करीत होता. वडूज येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यासाठी घेवून गेल्याची माहिती देण्यात आली.