ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र आयुर्वेद हॉस्पिटल असोसिएशन (MAHA) च्या वतीने आज रविवार दि. 19 जून, 2022 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील संत नामदेव सभागृहात आयुर्वेद क्षेत्रातील एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली.

प्रतिनिधी :- पंकज पिसाळ सातारा :- 77090 34150

*महाराष्ट्र आयुर्वेद हॉस्पिटल असोसिएशन (MAHA)* च्या वतीने आज रविवार दि. 19 जून, 2022 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील संत नामदेव सभागृहात आयुर्वेद क्षेत्रातील *एका नव्या अध्यायाला सुरुवात* झाली.

*महाराष्ट्र आयुर्वेद हॉस्पिटल असोसिएशन* तर्फे
*आयुर संपदा परिषद* आज आयोजित करण्यात आली होती. अवघ्या 3 दिवसांच्या पूर्वतयारीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील एकूण *180 शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सक* या परिषदेला उपस्थित राहिले होते.
आपल्या आयुर्वेदिक पंचकर्म सेट अप पासून आयुर्वेदिक हॉस्पिटल ते हेल्थ टुरिझम पर्यंत साठी लागणाऱ्या आवश्यक कायदेशिर बाबी, निरनिराळ्या प्रकारची रजिस्ट्रेशन्स, शासनाच्या आयुष विषयक तरतुदी असे बहुविध कांगोरे आजच्या या परिषदेच्या माध्यमातून मान्यवर वक्त्यांकडून हाताळण्यात आले.

डॉ मांगीरीश रांगणेकर, डॉ किरण पंडित, डॉ सुशील देशमुख, डॉ प्रशांत दौंडकर हे मान्यवर आजच्या परिषदेला वक्ते म्हणून लाभले होते. तसेच डॉ आशुतोष गुप्ता, डॉ सुनील आवारी, डॉ ज्ञानेश्वर थोरात, डॉ बाळासाहेब हरपळे ,डॉ.अजित राजगिरे,डॉ.मिलिंद काकडे या मान्यवरांनी आवर्जून आपली उपस्थिती नोंदवून अनेक शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले.

केवळ आपल्या स्वतः च्या प्रॅक्टिसपुरते मर्यादित न राहता आयुर्वेद क्षेत्रात देखील सर्व शासकीय नियमांनी परिपूर्ण अशी अनेक सुसज्ज आयुर्वेदिक हॉस्पिटल्स येत्या काळात यशस्वीपणे उभी राहावीत या उदात्त हेतूने *महाराष्ट्र आयुर्वेद हॉस्पिटल असोसिएशन* भविष्यात देखील वेळोवेळी अशाच परिषदांचे आयोजन करत राहील. तेंव्हा या चळवळीत सामील व्हा आणि बदलत्या काळात स्वतः ला अपडेट ठेवा.
असे आवाहन
*महाराष्ट्र आयुर्वेद हॉस्पिटल असोसिएशनचे* आयोजक
वैद्य सुकुमार सरदेशमुख
वैद्य प्रशांत दौंडकर
वैद्य राहुल शेलार
वैद्य विक्रांत पाटील
वैद्य अभय जमदग्नि
वैद्य निलेश लोंढे
यांनी केले.

प्रतिनिधी
वैद्य. पंकज पिसाळ, वैद्यकीय सल्लागार, RPS International Press Reporter Association

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button